Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित


चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित
 

पुणे : वाहतूक नियमनासाठी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्या चौकात कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले. निलंबित करण्यात आलेले तीन पोलीस कर्मचारी खडक वाहतूक विभागातील आहेत. पोलीस हवालदार संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार, मोनिका प्रवीण करंजकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वाहतूक नियमनासाठी वाहतूक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला हद्दीतील चौक आणि प्रमुख रस्त्यावर नेमणूक केली जाते. चौकातील वाहतूक नियमन ही कर्मचाऱ्याची जबाबदारी असते. मात्र, अनेक कर्मचारी त्यांना नेमून दिलेले चौक सोडून इतरत्र उभे राहतात. गाड्या अडवून त्यांच्याकडे वाहन परवाना, तसेच गाडीची कागदपत्रे मागून कारवाई केली जाते.
 

वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी घोळक्याने एका ठिकाणी थांबून कारवाई करतात. खडक वाहतूक विभागातील हवालदार यादव यांची १५ मे रोजी टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौक, पवार यांची हिराबाग चौक, तसेच करंजकर यांची भावे चौकात नेमणूक करण्यात आली होती. प्रत्यक्षात यादव, पवार आणि करंजकर हे नेमणूक केलेले चौक सोडून पूरम चाैकात आले. त्यांनी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली. तिघे कर्मचारी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच चौकात वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे आढळले. त्यानंतर वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.