Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी", त्या मजकुराची चर्चा

"तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी", त्या मजकुराची चर्चा
 

पुण्यातील गाजलेल्या 'हगवणे प्रकरणा'नंतर महागड्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीचा समाजातील प्रतिमा झपाट्याने बदलली आहे. पूर्वी केवळ श्रीमंती आणि पॉवरची ओळख असलेली ही गाडी आता संशयाच्या नजरेने पाहिली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्युनरवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

सध्या अनेक राजकीय नेत्यांकडे असलेल्या फॉर्च्युनर गाड्यांवर  जनतेत वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मिळालेल्या फॉर्च्युनरवरही आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर हगवणे कुटुंबीयांच्या प्रकरणाने या गाडीभोवती नकारात्मक वलय तयार केलं.

अशा वातावरणात, अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्युनरवर लिहिलेला मजकूर खूपच वेधक ठरतो:
"तशी तर मी मोठ्या घरची राणी,
मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी.
मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा,
हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा.
अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय,
पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू-धू धुतलंय!"
 
या कवितेच्या स्वरूपातील मजकुराने लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. समाजमाध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांनी खूपसे यांच्या सडेतोड आणि विनोदी शैलीचं कौतुक केलं आहे. एकेकाळी प्रतिष्ठेचं प्रतीक असलेली फॉर्च्युनर आता काही व्यक्तींमुळे चर्चेचा आणि विनोदाचा विषय झाली आहे, हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. मात्र, खूपसे यांच्या प्रतिक्रिया ही एका सामान्य नागरिकाची भावना व्यक्त करत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.