'त्याने माझा वापर करून सोडलं', बड्या खासदारावर उच्चशिक्षित महिलेचा गंभीर आरोप; पोस्ट करत पत्ते उघड
मध्य प्रदेशातील इंदूर येथील पीएचडी स्कॉलर डॉ. रोहिणी घवारी हिनं लोकसभा खासदार आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली.
रोहिणीने पोस्टमध्ये, ती चंद्रशेखरची पीडिता क्रमांक ३ असल्याचं सांगितलं. तसेच चंद्रशेखर आणि त्यांच्या कुटुंबाने शोषण केले असल्याचा आरोप महिलेनं केला. ही घटना उघडकीस झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
डॉ. रोहिणी घवारी पीएचडी स्कॉलर आहे. इंदुरच्या बीमा रूग्णालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची ती मुलगी आहे. २०१९ साली ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली होती. दरम्यान, शिक्षण घेत असताना तिची ओळख चंद्रशेखर यांच्यासोबत झाली. दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले, नंतर ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यात बिनसलं होतं. यानंतर आता तिनं नुकतंच एक्स पोस्टवर चंद्रशेखर यांच्यावर गंभीर आरोप करत पोस्ट शेअर केली.
दरम्यान, तिने दोन पोस्ट शेअर केल्या असून, पहिल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, "चंद्रशेखर हा दलित समाजासाठी एक कलंकित नेता आहे. एकीकडून फसवून दुसरीकडे, आणि तिसरीकडे जाणं ही त्याची सवय आहे. फसवणूक आणि विश्वासघात हे त्याच्या रक्तातच आहे." अशा शब्दांत रोहिणीने आझाद यांच्यावर सडकून टीका केली.
यानंतर तिने दुसरी पोस्ट शेअर करत बरेच गंभीर आरोप केले आहेत. "चंद्रशेखरने मला वापरून टाकलं. बहिणी-मुलींच्या सन्मानाला त्याच्यासाठी काहीही किंमत नाही. बहुजन चळवळीच्या नावावर दलित समाजातील महिलांच्या विश्वासाशी खेळ केला जात आहे." तसेच, "गेल्या दहा वर्षांत त्याने समाजासाठी एकही चांगलं काम केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. भाजपच्या कृपेने तो खासदार झाला, पण खरा समाजनेता तो कधीच बनू शकणार नाही", असेही तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
'दलित-मुस्लिम मतं विभागण्यासाठी, भाजप त्याचा वापर करेल आणि २०२७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्याला फेकून देईल. एके दिवशी त्याला स्त्रीचे जीवन उध्वस्त केल्याबद्दल नक्कीच शिक्षा मिळेल! मी त्या दिवसाची वाट पाहत आहे! ३ जून २०२१ हा माझ्या आयुष्यातील दुर्दैवी दिवस आहे', असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.