मुंबई :- “जेब काटना मेरी मजबुरी थी, २००६ से मैने जेब काटना सुरू किया, मेरे पिताजी नही थे, मेरा एक दोस्त था, वो मेरेसे पहले यह काम करता है, कम टाइम मे जादा पैसा मिलेगा इसलिए मै उसके साथ जाता था, बाद मे चोरीके पैसो का हिस्सा होता है, उसमे कुछ हिस्सा जीआरपी को जाता है! “रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या एका चोराने एका स्थानिक युट्युब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. चोराच्या या धक्कादायक वक्तव्याने मुंबई लोहमार्ग पोलीस दलात खळबळ उडवुन दिली आहे. कथित गुन्हेगाराने युट्युब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे.
इलियास (ओळख पटू नये म्हणून काल्पनिक नाव) हा मुंबईतील लोकल ट्रेन, एक्सप्रेसमध्ये चोऱ्या करणारा अट्टल चोर आहे. लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस (कुर्ला टर्मिनस), कुर्ला उपनगरीय रेल्वे स्थानक हे त्याचे चोरीचे ठिकाणे होती. इलियासची एका स्थानिक युट्युब वाहिनीवरील मुलाखत प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, इलियास ने आपली ओळख लपविण्यासाठी मुलाखत देताना आपला चेहरा रुमालाने झाकला होता.त्याने युट्युब मुलाखतीत कुर्ला रेल्वे पोलिसांची पोलखोल केली आहे, इलियास हा २००६ पासून चोरीच्या गुन्ह्यात असल्याचे त्याने मुलाखतीत कबूल केले आहे, दोन गुन्ह्यात त्याने नुकतीच शिक्षा भोगून (जामिनावर) बाहेर आला व त्याने त्यांच्यावरील नॉन बेलेबल वॉरंट रद्द केले असल्याचा दावा इलियास करीत आहे. मी सर्व सोडून चांगल्या मार्गाने जाणार असल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले आहे, तसेच त्याला या चोरीच्या धंद्यात आणणाऱ्या मित्राला मुलाखतीत दोषी ठरवले आहे.इलियासने मुलाखती असे म्हटले आहे की, २००६ मध्ये चोरीच्या गुन्ह्यात आलो, मला या धंद्यात आणणारा त्याचा मित्र असून तो माझ्यापुर्वी पासून या धंद्यात आहे, आम्ही चोरी केलेल्या रकमेचा तसेच मौल्यवान वस्तूचा हिस्सा केला जातो, मित्राचा भाऊ हे हिस्से करतो, त्यातील काही हिस्सा जीआरपीला जातो असा खळबळजनक दावा इलियास या चोराने मुलाखतीत केला आहे. इलियास या चोराने युट्युब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या मुलाखती संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.