Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासगी सचिवांच्या नेमणुकीस 'खो' मुख्यमंत्री फडणवीसांकडून सात मंत्र्यांना संमती नाही

खासगी सचिवांच्या नेमणुकीस 'खो' मुख्यमंत्री फडणवीसांकडून सात मंत्र्यांना संमती नाही
 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास सहा महिन्यांनंतरही सात मंत्र्यांना खासगी सचिवांच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी मिळत नसल्याने विशेषत: शिवसेनेच्या मंत्र्यांची अडचण झाली आहे. यामुळे महायुतीमध्ये फार काही अलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विविध मंत्र्यांच्या कार्यालयांत २२ विशेष कार्य अधिकाऱ्यांचीही नियुक्त्या स्थगित केल्यावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खदखद असल्याची चर्चा आहे.

या नियुक्त्या रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदे यांच्याकडे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यास खासगी सचिव म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळत नसल्याचीही तक्रार केली आहे. यामध्ये शिवसेनेच्या उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड या चार मंत्र्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणे व नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. तसेच भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनाही अजून खासगी सचिव मिळाला नसल्याची माहिती आहे. यातील अनेक प्रकरणांत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या शिफारस केलेली नावे वगळून त्यांचा प्रस्ताव परत पाठवला आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा मंत्र्यांचा प्रयत्न फसला आहे.

यातील काही मंत्र्यांनी नव्याने प्रस्ताव पाठवला आहे तरी अजून प्रस्ताव स्वीकारला गेला नसल्याची माहिती आहे. मविआच्या मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांना घ्यायचे नाही, ज्यांचे रेकॉर्ड चांगले नाही त्यांनाही घ्यायचे नाही अशा चाळण्या या नियुक्त्यांसंबंधी लावल्या होत्या.

खासगी सचिव नसलेले मंत्री

गुलाबराव पाटील

दत्ता भरणे

शंभुराज देसाई

उदय सामंत

छगन भुजबळ

गणेश नाईक

संजय राठोड

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.