धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बी. एम. मोहळकर नावाचे शिक्षक शाळेत दारूच्या नशेत हजर झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक यापूर्वीही अनेक वेळा नशेत शाळेत आल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्यावर याआधीही शाळेतील प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून समज देण्यात आली होती. मात्र, त्यांनी कोणतीही सुधारणा न करता पुन्हा एकदा नशेच्या अवस्थेत वर्गात प्रवेश केला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता शिक्षण विभागाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून, अशा शिक्षकांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत असल्याचेही ते म्हणाले. ग्रामस्थांनी याप्रकरणी लेखी तक्रार सादर केली असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित शिक्षकावर निलंबनासह कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. शिक्षण विभाग या प्रकरणी काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.