Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओव्हरडोस नडला; नागपूरच्या तळीरामाचा गोव्यात मृत्यू

ओव्हरडोस नडला; नागपूरच्या तळीरामाचा गोव्यात मृत्यू
 

वास्को: दारुचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने ३७ वर्षीय नागपूरच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ३१ मे रोजी झुआरीनगर, वास्को येथे हा प्रकार उघडकीस आला.

वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय नागपूरचा व्यक्ती वास्को येथील झुआरीनगर येथे वास्तव्यास आहे. ३१ मे रोजी त्याने मित्रांसोबत अधिक प्रमाणात मद्य पिले. फ्लॅटवरती तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. मित्रांनी त्याला चिखली येथील रुग्णालयात दाखल केले पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, व्हिसेरा राखून ठेवला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.