Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकिय व्यावसायिकांच्या पाठिशी सांगली पोलीस दल

वैद्यकिय व्यावसायिकांच्या पाठिशी सांगली पोलीस दल
 

आदित्य हॉस्पिटल, विश्रामचाग, सांगली येथील घडलेल्या तोडफोडीच्या घटनेच्या अनुषंगाने दि. ०५.०६.२०२५ रोजी ११.०० वा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे सांगली जिल्हयातील डॉक्टरांची बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये उपस्थित डॉक्टर्स यांनी यापुढे हॉस्पिटल व डॉक्टर्स यांचेवर हल्ला होणार नाही याकरीता घडलेल्या घटनेमधील सर्व संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, डॉक्टर्स व पोलीस यांचे मधील सुसंवाद वाढवाचा अशा सुचना करुन आदित्य हॉस्पिटल येथे घडले घटनेचायत पोलीसांना माहिती मिळाले नंतर तात्काळ दोन ते तीन मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना ताब्यात घेवून त्यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल केल्याने सांगली पोलीसांच्या तत्परतेसाठी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करून सांगली पोलीस दल असेच डॉक्टरांचे पाठिशी उभे राहील अशी आशा व्यक्त केली.

आदित्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या घटनेमध्ये पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून १७ आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे, गुन्हा दाखल करताना कायदयातील योग्य कलमांचा वापर करण्यात आला असून नमूद गुन्हयातील मुख्य सुत्रधार याचेवर या पुर्वीचे गुन्हे दाखल असून तो व त्याचे इतर साथीदारांवर उचित प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. समाजामाध्ये वैद्यकीय व्यावसायिकांकडून पुरविण्यात येणाऱ्या शासकीय योजनाचद्दल चुकीची माहिती पसरविणे, अशांतता माजविणे, डॉक्टरांना जाणून बुजून त्रास देणे, वैद्यकीय व्यावसायिकांना खंडणीची मागणी करणे असे प्रकार घड़त असल्यास डॉक्टरांनी निर्भयपणे याबाबत पोलीसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सर्व डॉक्टरांना केले. अशा प्रवत्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, पोलीस प्रशासन डॉक्टरांच्या पाठिशी आहे असे प्रतिपादन मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी बैठकी दरम्यान केले.

सांगली व मिरज हे वैद्यकीय केंद्र (मेडिकल हब) मानले जाते. सांगली जिल्हयामध्ये उपचाराकरीता आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. आदित्य हॉस्पिटल मध्ये घडलेल्या घटनेसारखी घटना पुन्हा घडू नये, याकरीता जिल्हा स्तरावर व सांगलीतील प्रत्येक तालुका स्तरावर हॉस्पिटल सुरक्षा व हिंसाचार प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात येत असलेबाबत पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले. या समितीमध्ये जिल्हा स्तरावर पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय सांगली, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष व वैद्यकिय व्यावसायिकांचे तीन प्रतिनिधी यांचा समावेश असेल तसेच तालुका स्तरीय समितीमध्ये संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वैद्यकीय व्यावसायिकांचे तीन प्रतिनिधी असतील अशी माहिती पोलीस अधीक्षक, सांगली यांनी बैठकी दरम्यान दिली. ही समिती वैद्यकीय व्यावसायिकांना योग्य ती कायदेशीर मदत करणे तसेच त्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांचे कायदेशीर मार्गाने निराकरण करण्याचे काम करणार आहे.

मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचे हॉस्पिटलमध्ये काही अनुचित घटना घडू नये याकरीता सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावून ते सुस्थितीत असलेचाबतची खात्री करुन घेण्याबाबत, हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक नेमणेबाबत, हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी नागरीकांना/नातेवाईकांना पासची सोय करून देण्याबाचत, स्वागत कक्ष, सहाय्यता कक्ष याठिकाणी रूग्णांना मार्गदर्शन करण्याकरीता प्रशिक्षित स्टाफ नेमणेबाबतच्या सुचना केल्या. आदित्य हॉस्पिटल प्रमाणे अथवा हॉस्पिटल सुरक्षे संबंधाने काही अप्रिय घटना घडण्याची शंका असलेस तात्काळ पोलीस दलाकडील डायल ११२ या हेल्पलाईन यर अथवा नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, संबंधीतांना तात्काळ मदत करुन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

हॉस्पिटलमध्ये नेमण्यात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करुन प्यावी, नातेवाईकांना अथवा इतरांना देण्यात येणाऱ्या प्रवेशावर नियंत्रण ठेवता येईल अशी नियोजन करावे अशा सुचना दिल्या. पोलीस दलाकडून हॉस्पिटल परिसरात पैट्रोलिंग, फिक्स पाईट नेमणार असलेबाबत सांगून सांगली पोलीस हे वैद्यकीय व्यावसायिकांचे पाठिशी उभे राहणार असलेबाबतचा विश्वास पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सर्वांना दिला. वरील बैठकीस मा. पोलीस अधीक्षक, सांगली, पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय, पोलीस निरीक्षक, जिविशा, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. रियाज मुजावर, डॉ भास्कर प्राणी, डॉ. शिशीर गोसावी, डॉ. चंद्रशेखर हाळींगळे, डॉ. हर्षल कुलकर्णी, डॉ. दोरकर, डॉ. आदित्य सायंत तसेच इतर ७० ते ७५ डॉक्टर्स उपस्थित होते.

(भैरु तळेकर)

पोलीस निरीक्षक

जिविशा, सांगली.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.