Breaking News! भिंतींना भगदाड पाडून विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या
विध्यार्थ्यांचंच्या मेसमध्ये आत घुसलं, भरल्या ताटावरच 20 डॉक्टरांनी
प्राण सोडले
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. बीजे मेडिकल कॉलेज मेघनानी नगर परिसरातच आहे. हे विमान टेकऑफ केल्यानंतर 5 मिनिटांनी या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळलं.
हॉस्टेलच्या वर एक कॅन्टीन आहे, जिथे दुपारी वैद्यकीय विद्यार्थी जेवणासाठी येतात. बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे फोटोही समोर आले आहेत.विमानाचा मागचा भाग हॉस्टेल इमारतीवर लटकलेला दिसत आहे. त्याच वेळी, आगीचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे, ज्यामुळे धूर निघताना दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये सुमारे 50 ते 60 डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी जेवण करत होते.
काही डॉक्टर्स जागीच गेले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकांनी धाव घेतली आहे. जखमींना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. विमान कोसळताना फक्त मेसच नाही, तर शेजारील होस्टेलची इमारतही जोरदार हादरली. अनेक खोलींच्या भिंती पडल्या असून, संपूर्ण हॉस्टेल इमारत धोकादायक स्थितीत आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं असून, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या भीषण दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.