IMA सांगली–मिरज कृती समितीचा निषेध मोर्चा डॉक्टर आणि हॉस्पिटलवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात एकत्रित आवाज!
आदित्य हॉस्पिटल, सांगली येथे डॉक्टर, स्टाफ आणि हॉस्पिटलच्या मालमत्तेवर झालेल्या हल्ल्याचा IMA सांगली–मिरज कृती समितीतीव्र निषेध करते. अशा प्रकारच्या हिंसाचाराला पूर्णविराम मिळावा आणि दोषींवर
"महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था (हिंसाचार व नुकसान प्रतिबंधक)
कायदा २०१०" अंतर्गत कठोर, गैरजामिनीय कारवाई व्हावी, यासाठी निषेध
मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक:५ जून २०२५
वेळ:सकाळी १०.०० वाजता
मार्ग:
सुरुवात – आदित्य हॉस्पिटल, सांगली
समारोप –पोलीस मुख्यालय, सांगली
IMA
चे सर्व सदस्य, रेसिडेंट डॉक्टर्स, खाजगी व शासकीय डॉक्टर, नर्सेस, मेडिकल
स्टाफ आणि सर्व आरोग्य सेवकांना नम्र आवाहन – कृपया मोठ्या संख्येने
सहभागी व्हा.
हा निषेध मोर्चा केवळ डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यविषयक हक्कांच्या रक्षणासाठी आहे.
जे
कुणी सुजाण, संवेदनशील नागरिक असे मानतात की समाजाचे आरोग्यरक्षक – डॉक्टर
– सुरक्षित, सन्मानित आणि निर्भय असावेत, त्यांनीही या मोर्चात सहभागी
व्हावे*, असे विनम्र आवाहन आम्ही करतो.
IMA सांगली–मिरज वैद्यकीय हक्क कृती समिती
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.