Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...



पुण्यामध्ये घटस्फोटीत महिलेसोबत मोठी घटना घडली आहे. पहिल्या नवऱ्यापासून तिला पोटगीत पाच कोटी रुपये मिळाले होते, दुसऱ्या लग्नाच्या प्रयत्नात असलेल्या या महिलेला ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अनिवासी भारतीयाने चांगलाच गंडा घातला आहे. तिचे साडेतीन कोटी रुपये घेऊन पोबारा केला आहे. या महिलेने पुणे पोलिसांकडे दाद मागितली होती, यावरून पुणे पोलिसांनी या भामट्या एनआरआय तरुणाला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. घटस्फोट झाल्यानंतर महिला दुसरा जीवनसाथी शोधत असतात. अशा महिलांना हेरणारे देखील या समाजात वावरत असतात. कारण या महिलांकडे पोटगीद्वारे लाखो, करोडो रुपये आलेले असतात. या पैशांवर या भामट्या लोकांचा डोळा असतो. अशाच जाळ्यात ही घटस्फोटीत महिला अडकली आणि आरोपीने मॅट्रीमोनिअल साईटवर खोटे प्रोफाईल बनवून या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.

 

या महिलेने देखील आपल्याकडे पहिल्या पतीने दिलेले पोटगीचे पाच कोटी रुपये असल्याचे त्याला सांगून टाकले. आरोपीने त्याचे नाव डॉ. रोहित ओबेरॉय असल्याचे महिलेला सांगितले होते. परंतू या आरोपीचे खरे नाव अभिषेक शुक्ला असे असून तो लखनऊचा राहणारा आहे. त्याच्याकडून ऑस्ट्रेलियाई पासपोर्ट सापडला आहे. बुधवारीच त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. महिलेने एकूण ₹3,60,18,540 रुपये वेगवेगळ्या खात्यातून त्याला पाठविले होते. यानंतर आरोपीने तिला आपण आजारी असल्याचे सांगितले. तोंडाचा कॅन्सर झाला आहे आणि हळूहळू तिने तिच्याशी संपर्क थांबविला. अचानक या महिलेला सप्टेंबर २०२४ मध्ये विन्सेंट कुआन नावाचा एक मेल आला की डॉ. रोहित ओबेरॉय याचा मृत्यू झाला आहे. या महिलेला संशय आल्याने तिने तिच्या एका मित्राला याची माहिती दिली होती. त्याने तिला फसवणूक झाल्याचे सांगितले. यामुळे तिने नोव्हेंबर २०२४ ला पुणे पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले. या शुक्लाने ओबेरॉयच्या नावाने जवळपास ३१९४ महिलांना या मॅट्रीमोनिअल वेबसाईटद्वारे मेसेज पाठविलेले होते. यामुळे या ठगाने अनेकींना फसविले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.