Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, प्रियकराने OYO हॉटेलमध्ये चाकूने 17 वेळा केले वार; दोन मुलांच्या आईचा मृत्यू

प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, प्रियकराने OYO हॉटेलमध्ये चाकूने 17 वेळा केले वार; दोन मुलांच्या आईचा मृत्यू


कर्नाटकमधील बंगळुरुत एका ओयो हॉटेलमध्ये 33 वर्षीय महिलेची तिच्या 25 वर्षीय प्रियकराने चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरिणी, असं मृत महिलेचे नाव असून, आरोपी यशस हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.

दोघेही बेंगलुरूच्या केंगेरी भागातील रहिवासी होते. ही घटना पूर्णप्रज्ञा लेआउट येथील एका ओयो हॉटेलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली. जी सोमवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिणी ही दोन मुलांची आई होती आणि तिला यश सोबत आलं नातं संपवायचं होतं. मात्र यशसला तिचा हा निर्णय मान्य नव्हता आणि रागाच्या भरात त्याने हरिणीवर चाकूने 17 वेळा वार करून तिची हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, परंतु दोन दिवसांनंतर हॉटेल कर्मचार्‍यांना याची माहिती मिळाली.

सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, यशसला अटक करण्यात आली आहे. दक्षिण बंगळुरुचे डीसीपी लोकेश बी. जगलासर यांनी सांगितले की, दोघे गेल्या एका महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते. हरिणीने नातं तोडण्याचा निर्णय घेल्याने यशस संतापला आणि त्याने हे कृत्य केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.