शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात सर्वात मोठी घोषणा केली. भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही भास्कर जाधवांनी व्यक्त केली. पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसंच विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हंटल. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोड घडत आहे. भास्कर जाधव यांच्या Whatsapp स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे.
भास्कर जाधव यांनी सूचक Whatsapp स्टेटस ठेवले आहे. दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो... बुझने के बाद घी डालना व्यर्थ है... उसी प्रकार इंसान की कदर समय रहते कर लिजिये... वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है... सब साथ है, फिर भी एक खालीपन सा है.... रिश्तों में आज कल दिखावे का अपनापन सा है... असा Whatsapp स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलेला आहे. गेले काही दिवस भास्कर जाधव आपल्या पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. आपल्या पक्षातच त्यांची गोची झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच त्याचं whatsup ला ठेवलेलं आत्ताच स्टेटसचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो. पण तो विझाल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही असा भास्कर जाधव यांचा स्टेटस आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीबाबतचं मोठं विधान केलंय. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही भास्कर जाधवांनी व्यक्त केलीय. पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवलीय.. तर भास्कर जाधव यांनी पक्षाच्या व्यासपीठावर मन मोकळं करण्याचा सल्ला संजय राऊतांनी दिला.शिवसेनेतील बंडासंदर्भात देखील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांनी रोखठोक मत व्यक्त केलंय... शिवसेनेत झालेली फूट उद्धव ठाकरेंना टाळता आली असती, नाराज आमदारांना जाऊ न देता त्यांना रोखता आलं असतं मात्र, शिंदे फुटल्यावर सर्वांनी बघ्याची भूमिका घेतल्याचंही जाधव यांनी म्हटलं. एवढंच नव्हे तर पक्षाच्या संघटनात्मक रचनेवरही भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केलीय.. पक्षसंघटनेत पदांचे कोंडाळे तयार केल्याचा आरोप देखील भास्कर जाधवांनी केलाय. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेतील पंद काँग्रेसच्या संघटनेसारखी होतायत असं विधानही भास्कर जाधव यांनी केलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.