साधारण 10 ते 20 रुपयांना मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीसुद्धा आपल्या खिशाला चटका लावते. मग कल्पना करा, जर कोणी तुम्हाला सांगितले की एका पाण्याच्या बाटलीची किंमत लाखोंमध्ये आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
होय, हे खरं आहे. जगात एक अशी पाण्याची बाटली आहे, जी केवळ पिण्यासाठीच नाही, तर तिचं अस्तित्वही श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं. बहुतांश लोक प्रवासादरम्यान किंवा बाहेर असताना तहान लागल्यावर 10 किंवा 20 रुपयांची पाण्याची बाटली घ्यायचं टाळतात. ते विचार करतात की थोडं थांबू, घर किंवा ऑफिसमध्ये पोहोचल्यावरच पाणी पिऊ. कारण इतक्या किंमतीत त्यांना घरी 1 लिटर पाणी सहज मिळू शकतं. मात्र, जगात एक अशी बाटली आहे, जिच्या किमतीत एखादे आलीशान घर येईल.
सर्वात महागडी पाण्याची बाटली
ही बाटली म्हणजे ‘Acqua di Cristallo Tributo a Modigliani’. या ब्रँडचे पाणी जगात सर्वात महागडे मानले जाते. याची किंमत तब्बल 4,500,000 रुपये प्रति लिटर आहे. होय, ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही पूर्ण सत्य माहिती आहे. हे पाणी एका अप्रतिम आणि विलक्षण बाटलीमध्ये येते जी 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेली असते. म्हणजे ही बाटली फक्त पाण्याने नाही, तर सोन्याच्या तेजानेही झळकत असते. इतकंच नाही, तर या बाटलीचं डिझाईनही एका प्रसिद्ध कलाकाराच्या प्रेरणेतून तयार करण्यात आलं आहे.
‘Aqua di Cristallo’ची खासियत
या पाण्याची किंमत इतकी जास्त का आहे, असा प्रश्न कुणालाही पडेल. या पाण्याचं मूळ फिजी, फ्रान्स आणि आइसलँडमधील हिमनद्यांमध्ये आहे. या ठिकाणांहून पाणी गोळा केलं जातं आणि त्यानंतर एक खास प्रक्रिया करून बाटलीत भरलं जातं. हे पाणी फक्त स्वच्छच नाही, तर त्यात ऊर्जा देणारे घटक, नैसर्गिक खनिजे आणि आरोग्यासाठी फायदेशीर गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं. जगात इतके श्रीमंत लोक आहेत की अशी महागडी बाटली खरेदी करणारेही कमी नाहीत. त्यांच्यासाठी ही बाटली एक स्टेटस सिम्बॉल आहे. केवळ तहान भागवण्यासाठी नव्हे, तर जगाला दाखवण्यासाठी ते हे महागडे पाणी घेतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.