AI मुळे लाखो नोकऱ्या नाहीशा होणार? बिल गेट्स यांचा धक्कादायक इशारा, 'AI क्रांती'मध्ये फक्त 'या' 3 प्रकारच्या नोकऱ्या टिकतील!
सॅन फ्रान्सिस्को / सिएटल : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि तंत्रज्ञानविश्वातील प्रभावशाली व्यक्तिमत्व बिल गेट्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात दिलेला इशारा आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय.
"फक्त तीनच प्रकारच्या नोकऱ्या AI च्या युगात वाचणार आहेत", असं गेट्स यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आणि उरलेल्या बहुतेक नोकऱ्या लवकरच यंत्रांकडून घेतल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
AI क्रांतीचा तडाखा, सर्वसामान्य नोकऱ्यांवर गंडांतर
गेल्या काही वर्षांत AI आणि ऑटोमेशनने इतक्या झपाट्याने प्रगती केली आहे की, अनेक पारंपरिक उद्योगांमध्ये मानवी कामगारांची गरजच उरलेली नाही. ChatGPT, Google Gemini, Elon Musk चा Grok यांसारख्या AI टूल्सनी जगाला दाखवून दिलं आहे की, यंत्रं आता केवळ आदेश पाळत नाहीत, तर निर्णयही घेतात!
काय वाचेल? गेट्स यांच्यानुसार फक्त 'या' 3 क्षेत्रांत भविष्य सुरक्षित
आरोग्यसेवा
डॉक्टर, नर्स, थेरपिस्ट यांसारख्या भूमिकांमध्ये मानवी सहानुभूती, संवाद आणि व्यक्तिशः काळजी ही अनिवार्य आहे.
अभियांत्रिकी व AI डेव्हलपमेंट
AI निर्माण करणारे आणि त्याला नियंत्रित करणारे तज्ज्ञ नेहमीच आवश्यक राहतील. कारण एखादी यंत्रणा कितीही स्मार्ट असली, तरी तिची रचना माणूसच करतो.
सर्जनशील क्षेत्रं
लेखक, कलाकार, डिझायनर यांसारख्या नोकऱ्या जिथे मानवी कल्पकता, भावना आणि मौलिक विचार आवश्यक असतात, त्या AI साठी अद्याप आव्हान आहेत.
पण हे सुद्धा पूर्णतः सुरक्षित नाही!
गेट्स स्पष्ट सांगतात की, AI हे या नोकऱ्यांमध्ये सहाय्यक ठरेल, पण ते किती झपाट्याने शिकता आणि सुधारता, हे पाहता कुठलीच भूमिका शंभर टक्के सुरक्षित नाही. त्यामुळे "फक्त माणसेच करू शकतो" अशा कौशल्यांवर भर देणं गरजेचं आहे.
शिक्षण, कौशल्यविकास आणि धोरणांमध्ये मोठा बदल हवा
बिल गेट्स यांचं आवाहन आहे की, शासन, शिक्षणसंस्था आणि उद्योगक्षेत्राने यावर आता उपाययोजना सुरू करायला हव्यात. लोकांना नव्या कौशल्यांसाठी पुन्हा प्रशिक्षण देणं, शिक्षणव्यवस्था सुधारणं आणि "मानव-केंद्रित" क्षेत्रांना प्राधान्य देणं आवश्यक आहे.
AI हे फक्त भविष्य नाही, ते वर्तमान आहे!
गेट्स यांचा इशारा एक स्पष्ट संदेश देत आहे. AI आता फक्त येतोय असं नाही, ते आधीच आपल्यात आहे. आणि आपण वेळेत सज्ज झालो नाही, तर कोट्यवधी लोक बेरोजगारीच्या खाईत लोटले जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.