Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'च्या फाईलींचा ढीग; तासभर गप्पा अन् दारुचे घोट रिचवत सह्या

Big Breaking!  बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'च्या फाईलींचा ढीग; तासभर गप्पा अन् दारुचे घोट रिचवत सह्या
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मनीषनगर परिसरातील एका बिअर बारमधील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये 3 व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या फाइलींचा गठ्ठा घेऊन गप्पा मारत, दारु पीत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास तासभर गप्पा मारताना यातील एकजण या फाइलींमधील कागदांवर भराभर सह्याही करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, दुपारी तीनच्या सुमारास 3 जण मनीषनगरमधील या बिअर बारमध्ये आले. येताच त्यांनी टेबलवर सरकारी कामाच्या फाईल्सचा गठ्ठा ठेवला आणि दारूची ऑर्डर दिली. या फाईल्समधील कामांवरून त्यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती. गप्पा ऐन रंगात आल्या असतानाच एक जण त्यातील फाईलींवर सह्या करु लागला. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. 
 
या व्हिडीओनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय कामकाज बारमधून चालवणारे ते अधिकारी कोण? ते कोणत्या विभागाचे होते? रविवारी या साप्ताहिक सुट्टीदिवशी सरकारी फाईल्स कार्यालयाबाहेर आल्याच कशा? या व्हिडीओची दखल घेतली जाणार का? असे सवाल विचारले जात आहेत. दरम्यान, या बारमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा प्रकार सामोरं आला असून, या व्हिडीओची दखल घेऊन कारवाईची मागणी केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.