उपराजधानी नागपूरमध्ये बारमध्ये बसून सरकारी काम सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बिअर बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल क्लिअर करण्याचे काम सुरु असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. साम टीव्हीने दाखवलेल्या बातमीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. गडचिरोलीमधील चामोर्शी येथील उपअभियंता देवानंद सोनटक्के यांनी बिअर बारमध्ये सरकारी काम करत असल्याचे आणि ठेकेदाराला धरुन बिअर प्राशन केल्याची बातमी समोर आली होती. त्याचा दणका म्हणून आज देवानंद सोनटक्के यांना शासनातर्फे निलंबित करण्यात आले आहे.नागपूरमधील बिअरबारमध्ये सुरु असलेल्या कारभाराची राज्यभरात चर्चा पाहायला मिळत आहे. बारमध्ये बसून सरकारी अधिकाऱ्याने शासकीय फाईल दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बारमध्ये दारूचे घोट रिचवत सरकारी काम होत असल्याचे उघड झाले होते. याच प्रकाराचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला.सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये टेबलावर तिघेजण बसलेले दिसतात. या टेबलावर महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्स दिसतात. या फाईली पाहताना ते काय काम करत होते, याविषयी चर्चा सुरु झाली. हे अधिकारी गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता यातील देवानंद सोनटक्के या अधिकाऱ्याचे निलंबन झाल्याची माहिती समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.