Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नांदणीच्या 'महादेवी' हत्तीणीचा निकाल आला, सर्वोच्च न्यायालयाने म्हणनेही ऐकून घेतलं नाही; अंबानी जिंकले

नांदणीच्या 'महादेवी' हत्तीणीचा निकाल आला, सर्वोच्च न्यायालयाने म्हणनेही ऐकून घेतलं नाही; अंबानी जिंकले
 

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या 'महादेवी हत्तीण' प्रकरणी आज (ता. २८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मठांतर्गत येणाऱ्या ८६५ गावांचे सुनवणीकडे लक्ष लागले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचीका फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या जो आदेश आहे तो कायम राहिल असे सांगण्यात आले.

यावर मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य असून यावर मी जास्त काही बोलणार नाही. याचबरोबर उद्या (ता. २९) मठामध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. हत्तीणीला नेण्यासाठी काही दिवसांपासून जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक दाखल झाले आहे. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे हत्तीणीला नेणे शक्य झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदविताना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नांदणी येथील 'महादेवी हात्तीणी'ला गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले होते.
 
वनविभागाची परवानगी न घेता मिरवणुकीत या हात्तीणीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या 'पेटा' संघटनेने केला होता. न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने जून आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये हत्तीणीच्या तपासण्या करून अहवाल सादर केला होता. दरम्यान, नांदणी येथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील जैन समाजाच्या ७४८ गावांचा पुरातन मठ आहे. मठाचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. मठामध्ये प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून परंपरागतरीत्या या मठामध्ये हत्तीण सांभाळली जाते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.