Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांना आता मोबाईलवर फोटो काढून दंड करण्यास बंदी

पोलिसांना आता मोबाईलवर फोटो काढून दंड करण्यास बंदी
 

महाराष्ट्र राज्यातील वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदारांना वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो, चित्रीकरण करता येणार नाही, असे केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे बजावले आहे. संबेधित पत्र अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळूंके यांनी सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांना जारी केले आहे. वाहतूक नियमानुसार कर्तव्यावर कार्यरत वाहतूक पोलिस कर्मचारी, अमलदार यांना दंडात्मक कारवाई करता येत नसतानाही हे कर्मचारी वाहनचालकांवर कारवाई करून दंड आकारतात, ई-चालान करतात. असे न करणेबाबत यापुर्वीच संबंधित विभागाला आदेशीत करण्यात आले होते. असे असतानाही अद्यापही पोलिस अधिकारी, अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो, चित्रीकरण करून वास्तविक वेळ सोडून, त्यांच्या सोयीनुसार ई-चलान प्रणालीमध्ये त्यांच्या मोबाईलमधील फोटो, चित्रफितचा वापर करून चुकीच्या पध्दतीने चलान जनरेट करतात. अशाप्रकारे खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई-चलान करताना निदर्शनास आले होते. वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांना तशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या.

तक्रारी संदर्भाने 2 जुलै रोजी परिवहन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत वाहनचालक, मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या वैयक्तिक मोबाईलमधून फोटो, चित्रीकरण करण्याच्या प्रकाराबाबत तक्रारी केल्या. यामुळे वाहनधारक, मालकांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होते, त्यात चुकीचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होते, असे बैठकीत निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर, उपमहानिरीक्षक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार, यापुढे सर्व दंडात्मक कारवाई अधिकृत कॅमेर्‍यांद्वारे, सिस्टमवर रेकॉर्ड ठेवून आणि रीयल टाइम डेटाच्या आधारे केली जावी.taking-photos-on-mobile जर एखाद्या पोलिसाने स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढून दंडात्मक कारवाई केली, तर त्याच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे बजावण्यात आले. यासंबंधिचा आदेश 3 जुलैरोजी सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांना अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळूंके यांनी जारी करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेल्या पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिसांना केवळ ई-चालान यंत्राचाच वापर करूनच कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करावी.

- नागेश भास्कर, पोलिस निरिक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.