सांगली ः येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सामान्य रुग्णांना अद्यावत सोयीसुविधा मिळत नाहीत:, पृथ्वीराज पाटील
रुग्णांसाठी पुरेसे बेड नाहीत. अत्याधुनिक मशिनरी उपचारासाठी उपलब्ध नाहीत. त्यात लवकर लक्ष घालून ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या ४४२ कोटींच्या सुधारित अंदाजपत्राच्या प्रस्तावास उच्चाधिकारी समितीची मान्यता लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यांनी लवकरच मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. मंत्री मुश्रीफ यांच्या मिरज दौऱ्यावेळी
पृथ्वीराज पाटील यांनी त्यांच्याशी सांगली सिव्हिलबाबत सविस्तर चर्चा
केली. महाविकास आघाडीच्या काळात श्री. पाटील यांनी तत्कालीन वैद्यकीय
शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडून ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर करून
आणले होते. तो प्रस्ताव २३३ कोटीचा होता, आता तो ४४२ कोटीचा झाला आहे.
त्याचा सुधारित प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर असून त्याला लवकर मान्यता
मिळावी, अशी त्यांनी मागणी केली. श्री. मुश्रीफ यांनी त्याला नवीन
प्रशासकीय मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘हसन मुश्रीफ यांच्याकडे मी सांगली सिव्हिलमधील सुविधांबाबत आग्रही मागणी केली. सांगली सिव्हिलमध्ये नवीन ५०० खाटांचे रुग्णालय बांधकाम सुरू होण्यासाठी ४४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो प्रस्ताव वित्त विभागास पाठवून उच्चाधिकार समितीची मान्यता मिळायला हवी. येथे अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. यासाठी निधी मागितला. एमआरआय मशीन आणि दोन सोनोग्राफी मशीनची अत्यंत गरज आहे त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतींची डागडुजी करावी. २०२१ ला झालेल्या इलेक्ट्रिक ऑडिटवर प्रत्यक्ष काम करायला हवे. पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे डॉक्टर्स व वर्ग चारची रिक्त पदे तात्काळ भरावीत, याकडे लक्ष वेधले.’’श्री. पाटील म्हणाले, ‘‘सांगली सिव्हिलने दिलेल्या पत्रानुसार वर्ग चारकर्मचारी यांच्या कडून स्वच्छता व मुलभूत सेवा करून घेण्यात येतात. त्यांना वारसा हक्काने पुढील पिढीला नोकरीत संधी मिळायला हवा. त्याबाबत सहानुभुतीने विचार करावाच, शिवाय तो शासन निर्णयाला धरून आहे. त्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणीदेखील मी श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.’’
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.