जगभरात सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सामान्यांसाठी सोनं हळूहळू परवडण्याच्या बाहेर जात आहे. येत्या काही वर्षांत सोन्याचे दागिने घेणे अनेकांसाठी स्वप्नवत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत एका वैज्ञानिक शोधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संशोधकांनी असा एक चमत्कारिक बॅक्टेरिया शोधून काढला आहे जो विषारी माती खाऊन त्यातून २४ कॅरेट शुद्ध सोनं बाहेर टाकतो
काय आहे या बॅक्टेरियाचे गुपित?
या अद्भुत बॅक्टेरियाचे नाव आहे कप्रीएविडस मेटालिड्यूरन्स (Cupriavidus metallidurans). याला विषारी आणि धातूंनी भरलेली माती अतिशय प्रिय असते. ही माती खाल्ल्यानंतर तो त्यावर रासायनिक प्रक्रिया करतो आणि तिच्यातील धातूंना सोन्याच्या कणांमध्ये रूपांतरित करतो. नंतर हे सोन्याचे शुद्ध कण तो आपल्या विष्ठेतून बाहेर टाकतो. थोडक्यात, हा बॅक्टेरिया जणू 'सोनं खणणारा जीवाणू' बनला आहे. सध्या जगभरात सोनं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते. या प्रक्रियेमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. पण या बॅक्टेरियामुळे हे चित्र बदलू शकते. कमी खर्चात, कमी प्रदूषणात आणि अधिक शुद्धतेने सोनं मिळण्याची शक्यता आता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
ई-वेस्टमधूनही सोने निर्माण?
या बॅक्टेरियाचा उपयोग फक्त खाणीपुरता मर्यादित राहणार नाही. जुने इलेक्ट्रॉनिक वेस्ट, खाणीत उरलेली माती आणि इतर टाकाऊ धातूंमधूनही या बॅक्टेरियाच्या मदतीने सोनं वेगळं करता येऊ शकणार आहे. त्यामुळे हा शोध फक्त वैज्ञानिक क्षेत्रासाठीच नव्हे तर पर्यावरण, उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठीही एक क्रांतिकारक बदल ठरू शकतो. या शोधामुळे वैज्ञानिकांनी जणू सोन्याची लॉटरीच जिंकली आहे, असे म्हटले जात आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी गुंतवणुकीत अधिक सोनं मिळवणं शक्य होईल. आणि पर्यावरणालाही धक्का न लावताया शोधामुळे खाण उद्योगात क्रांती येण्याची चिन्हं आहेत. जगातील मौल्यवान धातूंमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या तरी हे संशोधन प्रयोगशाळेपुरते मर्यादित आहे, पण येत्या काळात या बॅक्टेरियाच्या वापराला औद्योगिक स्तरावर मान्यता मिळाली, तर सोनं निर्माण करण्याची ही 'जैविक क्रिया' संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेईल, यात शंका नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.