भाजप नेते नारायण राणे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे शिवसेनेत आले तर ते प्रमुख होतील. उद्धव ठाकरे नगण्य राहातील, पण शिवसेना एकनाथ शिंदेंचीच ओरिजनल आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
मुलं कोणाच्या घरी जन्माला येतं आणि बारसं कोण करतं असं आहे. एकत्र असते तर वेगळे झाले असते का? आता मराठी माणूस आठवला यांना, मराठीसाठी शिवसेना मग मराठी माणसं गेली कुठे? अडीच वर्षात दोन दिवस मंत्रायात आले. काय केलं मराठी माणसांसाठी? मराठी आणि हिंदुत्वावर बोलायचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही, दोघांची संख्या काय आहे? राज ठाकरे शिवसेनेत आले तर ते प्रमुख होतील, उद्धव ठाकरे नगण्य राहातील. पण एकनाथ शिंदेंची शिवसेना ओरिजन आहे. सरकारला घेरण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही, आम्हाला त्रास काही नाही, भावांनी एकत्र या आम्हांला काही चिंता नाही. यांना आम्ही गिणतीत धरत नाहीत, असा हल्लाबोल यावेळी राणे यांनी केला आहे.दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. आता राज ठाकरेंच्या स्वागतला हे येत आहेत, ठाकरे कुटुंबांबद्दल मला काही बोलायचं नाही. पण राज ठाकरेंना घराबाहेर जायला का प्रवृत्त केलं? हा प्रश्न आहे. हा विजय नको त्या विषयाचे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी माणासांच्या हक्कासाठी लढणारी सेना तर मग मराठी माणूस कुठे गेला? अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले, काय केलं मराठी माणसासाठी? शिवसेनेच्या नावावर यांनी उदरनिर्वाह केला, ओरीजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, ठाकरेंकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. कोणी कुठे जायचे हा ठाकरेंचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र राज ठाकरेंना शिवसेनेत या असं हे कधीच म्हणू शकत नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.