Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रमीचा डाव उलटला! कोकाटेंच्या राजीनाम्याची तारीख ठरली? सकाळी नऊ वाजता.

रमीचा डाव उलटला! कोकाटेंच्या राजीनाम्याची तारीख ठरली? सकाळी नऊ वाजता.
 

पावसाळी अधिवेशनाचं सत्र राजकीय गदारोळात गाजत असतानाच, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  एका नव्या वादात अडकले आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर 'रमी' हा कार्ड गेम खेळताना दिसत असल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, विरोधकांनी यावर सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
 
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांचा रोष, सरकारमधील नाराजी आणि वाढता दबाव लक्षात घेता, माणिकराव कोकाटे आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

कोकाटेंच्या व्हिडिओमुळे सरकारची कोंडी

सदर व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला. विधानसभेत चालू अधिवेशनादरम्यान कोकाटे मोबाईलवर गेम खेळत असल्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात टीकेची लाट उसळली. एकीकडे जनतेच्या अडचणी मांडण्याचं आणि चर्चेचं महत्त्वाचं अधिवेशन सुरू  असताना, दुसरीकडे मंत्री मात्र वेळ 'रमी'सारख्या गेममध्ये घालवत आहेत, ही गोष्ट विरोधकांनी मुद्दाम अधोरेखित केली.सामाजिक माध्यमांवरील दबाव, विरोधकांचे वाढते हल्ले आणि अंतर्गत अस्वस्थता पाहता, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केल्याची माहिती मिळते. त्यानंतर अजित पवार यांनी कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना समज दिली. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राजकीय वर्तुळात राजीनाम्याची चर्चा
काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, आज कोकाटे स्वतःहून राजीनामा जाहीर करू शकतात. कारण एकीकडे विरोधकांचा दबाव वाढत असून, दुसरीकडे सरकारला यामुळे झालेल्या फजितीची जाणीव आहे. अशा परिस्थितीत पक्षाची आणि सरकारची इमेज वाचवण्यासाठी कोकाटेंचा राजीनामा 'डॅमेज कंट्रोल' म्हणून स्वीकारला जाऊ शकतो. आज सकाळी 9 वाजता माणिकराव कोकाटे पत्रकार परिषद घेणार असून, त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केवळ माफीनामा पुरेसा ठरेल का, की ते आपल्या पदाचा राजीनामा देतील? असा प्रश्न अनेकांच्याच मनात आहे.

मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना सभागृहात 'रमी' खेळणं म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा अवमान आहे, असा स्पष्ट सूर विरोधकांकडून उमटत आहे. सत्ताधाऱ्यांनी यावर ठोस भूमिका घ्यावी, अशी जनतेचीही अपेक्षा आहे. कोकाटे हे अजित पवार गटातील महत्त्वाचे मंत्री मानले जातात. पण त्यांच्या या चुकीमुळे सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्याने आणि सोशल मीडियावरून थेट कारवाईची मागणी केल्याने अजित पवार यांच्यासमोरही कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.