Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :-मला एक पप्पी दे तुला हवं ते देतो! पुण्यात ७३ वर्षीय वृद्धाकडून तरुणीचा विनयभंग

पुणे :-मला एक पप्पी दे तुला हवं ते देतो! पुण्यात ७३ वर्षीय वृद्धाकडून तरुणीचा विनयभंग


पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एका ७३ वर्षीय वृद्धाने दवाखान्यातील रिसेप्शनिस्ट तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. ही घटना समोर येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विश्रामबाग रोड परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. ३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दवाखान्यात ७३ वर्षीय सुरेशचंद चोरडिया नावाचा वृद्ध रुग्ण म्हणून आला होता, त्या दिवशी रिसेप्शनवर एकटीच तरुणी उपस्थित होती. ही संधी साधत आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले.

त्याने तिच्याकडे पप्पी देण्याती मागणी केली यानंतर खिशाकडे हात दाखवत म्हणाला, "माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ दवाखाना सोडला आणि बाहेर पळ काढला. पण तो वृद्ध एवढ्यावरच थांबला नाही तर तिच्या पाठलाग केला आणि उद्या दवाखान्यात आहेस का? असा प्रश्नही विचारुन तिला पुन्हा धमकावयचा प्रयत्न केला.

चोरडियाच्या या गैरवर्तनामुळे तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला पण तिने धाडसाने याबाबत तक्रार दिली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संबंधित कलमांखाली कारवाई होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.