Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसच्या दाव्याला सुरुंग : विरोधी पक्षनेतेपदासाठी फडणवीसांनी 'अनिल परबांना' तयार केलं?

काँग्रेसच्या दाव्याला सुरुंग : विरोधी पक्षनेतेपदासाठी फडणवीसांनी 'अनिल परबांना' तयार केलं?
 

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे निवृत्त होत आहेत. बुधवारी त्यांचा निरोप समारंभही पार पडला. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या विधान परिषदेचा संख्याबळ पाहता काँग्रेसकडे 7 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 सदस्य आहेत. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदावरील दावा उद्धव ठाकरे सहजासहजी सोडण्याची शक्यता वाटत नाही. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता अनिल परबांनी तयारी केली पाहिजे, असे म्हणत डिवचले आहे. त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत रण पेटण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. या जागी कोणाची तरी वर्णी लागणार याविषयी उत्सुकता असतानाच आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून अंबादास दानवे निवृत्त होत आहेत. त्यांची टर्म पुढील आठवड्यात संपणार असल्याने त्यांचा निरोप समारंभही पार पडला. त्यामुळे आता या पदावरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे.

अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे  यांच्या शिवसेनेला चांगलाच चिमटा काढला. देवेंद्र फडणवीस यावेळी भाषण करताना म्हणाले, 'अंबादास दानवे आता तुमचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर अनिल परब आता तुम्ही तयारीला लागा. त्यामुळे भाषणात दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अनिल परब यांच्या नावाचे संकेत देत शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सहजासहजी सोडणार का? की पडद्यामागे काही घडामोडी घडत आहेत याची चर्चा आता सुरू झाली आहे.
विधान परिषदेचे संख्याबळ पाहता काँग्रेसकडे 7 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 सदस्य आहेत. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य आहेत. हे संख्याबळ पाहिले तर सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपायच्या आधी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार हे प्रत्येकी सात होते.

खालच्या सभागृहात म्हणजेच विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विरोधी पक्षनेते पद हवे होते. त्यामुळे वरचं म्हणजेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसने आपल्याकडे मागितले. त्यामुळे सहाजिकच संख्या बळ आता काँग्रेसचे जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच होईल हे निश्चित आहे. मात्र तो कोण यावर अजूनही शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

काँग्रेसमध्ये दोन नावावरून रस्सीखेच
काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील हे आहेत. त्यामुळे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. विधान परिषदेत काँग्रेस पक्षाची बाजू ते मांडतात. त्यासोबतच त्यांचा अभ्यास देखील प्रत्येक विषयात दिसून येतो. दुसरे नाव राजेश राठोड यांचे आहे. राठोड देखील प्रत्येक विषय विधान परिषदेत विरोधकांची बाजू ठामपणे मांडतात. त्यामुळे राठोड यांच्या देखील नावाची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण आहे?
सध्या कोणीच नाही; हे पद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद का रिक्त झाले?
अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे हे पद रिक्त झाले.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण आघाडीवर आहे?
काँग्रेसकडून सतेज पाटील आणि राजेश राठोड यांची नावे चर्चेत आहेत.

शिवसेना (ठाकरे गट) कोणत्या पदासाठी दावा करत आहे?
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.