Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'त्या' सीडीमुळे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं; 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

'त्या' सीडीमुळे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं; 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
 

राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. वडेट्टीवार यांनी हनी ट्रॅप प्रकरणात सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, शिंदे सरकार सत्तेत येण्यामागे नाशिकच्या एका सीडीचा वाटा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

शिंदे सरकार आणि नाशिकच्या सीडीचा दावा
 
वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "काल मुख्यमंत्र्यांनी हनी ट्रॅपवरून 'हनी देखील नाही आणि ट्रॅपही नाही' असं म्हटलं. पण या प्रकरणाची मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे. कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाही नाही, म्हणून आम्ही गप्प आहोत. पण मागील वेळी शिंदे सरकार सत्तेत आलं, ती सत्ता परिवर्तनाची घटना नाशिकच्या एका सीडीमुळेच घडली." त्यांनी पुढे म्हटलं की, "या प्रकरणात खूप मोठी माणसं सामील आहेत. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, पण ते दाखवायचे झाल्यास त्यावर दहा-वीस हजारांचे तिकीट लावावे लागेल आणि विशिष्ट लोकांनाच ते दाखवावे लागेल."

लोकसभा यशानंतर विधानसभेतील पराभवाची कबुली
वडेट्टीवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण त्यानंतर आमच्या अंगात विजयश्रीचा एवढा माज आला की आम्ही सर्व जागा जिंकू असं वाटलं. त्यामुळे दीड महिना आम्ही केवळ चर्चेत घालवला. 28-30 बैठका झाल्या, पण प्रचार आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झालं. यामुळे सुमारे 40 दिवस वाया गेले आणि आम्हाला विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं."

हनी ट्रॅप प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असून, वडेट्टीवार यांच्या दाव्यांमुळे यावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यांनी शिंदे सरकारच्या सत्तापालटाशी संबंधित नाशिकच्या सीडीचा उल्लेख करून मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या विधानसभेतील पराभवाची कारणंही त्यांनी स्पष्ट केली आहेत. आता या प्रकरणात पुढे काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.