पाणी पुरवठा सुधारणा करण्याकामी दुरुस्ती साठी नदीतून पाणी उपसा बंद करण्यात येणार आहे. परिणामी शहरास पाणी पुरवठा अपुरा होणार आहे. नागरिकांना या व्दारे आवाहन करण्यात येते की, महानगरपालिका सांगली पाणी पुरवठा योजना अंतर्गत जॅकवेल उपसा केंद्र येथे महावितरण कंपनी कडील RMU(रिंग मेन युनिट)शिफ्टिंग करून विद्युत जोडणीने चार्ज करणे अनुषंगिक काम आणि पाणी पुरवठा सुधारणा करणेच्या कामांचे मोठ्या स्वरूपाच्या क्रॉस कनेक्शन्स करणेची महत्वाची कामे पाणी उपसा बंद ठेवुन जरूर त्या पुर्व तयारीनिशी मंगळवार दि.22/07/2025 रोजी सकाळ पासून हाती घेणेत येणार आहेत. वरील कामे मोठ्या स्वरूपाची असल्याने ती
टेस्टिंग सह पुर्ण करणेस वेळ लागण्याची शक्यता आहे. बुधवारदि२३/७/२०२५
रोजी सर्व भागात अपुरा पाणी पुरवठा होणार आहे.अशी माहिती श्री.चिदानंद
कुरणे, कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी
मंगळवार सकाळ सत्र मध्ये मिळणारे पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस
सहकार्य करावे, ही विनंती
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.