Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध शहर कुठलं? महाराष्ट्रातली किती शहरं? वाचा यादी

विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध शहर कुठलं? महाराष्ट्रातली किती शहरं? वाचा यादी
 

देशभरात विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढले असल्याचे आपल्याला माध्यमातील बातम्यांमधून दिसते. गुन्ह्यांशी संबंधित अनेक बातम्या या विवाहबाह्य संबंधामुळे घडलेल्या असल्याचे दिसत आहे. पूर्वी महानगरांमध्ये अशा घटना घडत असल्याचा समज होता. मात्र आता ग्रामीण आणि निमशहरी भागातही अशा घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. याला दुजोरा देणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असेलल्या ॲशले मॅडिसन या डेटिंग साईटने केलेल्या सर्व्हेवर सदर निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या अहवालातील माहितीनुसार, तमिळनाडूमधील कांचीपूरम हे शहर विवाहबाह्य संबंधामध्ये पहिल्या क्रमाकांचे शहर झाले आहे. दिल्ली आणि मुंबई सारख्या महानगरांनाही या शहराने मागे टाकले आहे. २०२४ च्या सर्वेक्षणात कांचीपूरमचा क्रमांक १७ वा होता. हे शहर यावर्षी थेट प्रथम क्रमाकांवर आले. दरम्यान ॲशले मॅडिसनकडून याचे निश्चित कारण मात्र दिलेले नाही.

ॲशले मॅडिसनवर साइनअप झालेल्या युजर डेटाबेसच्या माहितीनुसार, मध्य दिल्लीने सलग दुसऱ्यांदा भारतातील टॉप २० शहरांपैकी द्वितीय क्रमांक कायम ठेवला आहे. दिल्ली एनसीआर क्षेत्रातून या ॲपला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीतील मध्य दिल्ली, दक्षिण पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली हे सहा जिल्हे टॉप २० मध्ये आहेत. या बरोबरच दिल्लीच्या शेजारी असलेले गुरुग्राम, गाझीयाबाद आणि गौतम बुद्ध नगर (नोएडा) या जिल्ह्यांचाही समावेश टॉप २० मध्ये आहे.

महाराष्ट्रातील एकही शहर नाही

विशेष म्हणजे, या अहवालात टॉप २० मध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. मुंबईसारखे मोठे महानगर टॉप २० मध्ये नाही. पण जयपूर, कामरूप आणि चंदीगड सारखी शहरे या यादीत आहेत. जयपूर आणि गाझियाबाद या टायर-२ शहरांनी मोठ्या शहरांनाही मागे टाकले आहे. ॲशले मॅडिसनने दिलेल्या माहितीनुसार, अहवालातील माहिती ही फक्त किती नव्या युजर्सनी साइनअप केले त्यावर आधारित नाही, तर युजर्सची रोजची ॲक्टिव्हिटी, एंगेजमेंट डेटा याचे विश्लेषण करून सदर माहिती काढण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.