तिरुमला तिरुपती बालाजीचे दर्शनासाठी जाणार आहात? मग रांगेत न थांबता दर्शन घेण्यासाठी 'ही' योजना वाचा!
महिन्याला लाखो भाविक तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात. काहीजण आधीच ऑनलाइन तिकीट बुक करतात, तर काहीजण थेट तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, वाढत्या गर्दीमुळे अनेकदा लांबच
लांब रांगा लागतात आणि काही वेळा तिकीट असूनही दर्शन घेता येत नाही. ही
अडचण लक्षात घेऊन तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) एक विशेष सुविधा सुरू
केली आहे. 'श्रीवाणी दर्शन तिकीट केंद्र'. या नव्या तिकीट केंद्रामुळे आता
भक्तांना लांब रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा अधिक सुलभ,
जलद आणि सुस्थित दर्शन अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही
तिरुपती बालाजींच्या दर्शनाचा विचार करत असाल, तर या नव्या सुविधेबाबत
माहिती असणे नक्कीच उपयुक्त ठरेल.
कधी सुरु होणार ही योजना
जर तुम्ही तिरुपती बालाजींच्या विशेष दर्शनासाठी तिकीट बुक करू इच्छित असाल, तर ही सोय ऑक्टोबर 2025 पासून उपलब्ध होणार आहे. या विशेष तिकिटासाठी प्रति व्यक्ती 300 रुपये शुल्क आकारले जाईल आणि बुकिंग फक्त ऑनलाइन करता येणार आहे. दर्शनासाठी एक निश्चित स्लॉट दिला जाईल, ज्याद्वारे तुम्हाला प्रवेश मिळेल. तसेच, VIP दर्शन तिकीट सर्वात महाग असून त्यासाठी सुमारे 10,000 रुपये खर्च येतो. या तिकीटांद्वारे फक्त 1 तासाच्या आत आरामदायी दर्शन घेता येते. सामान्यतः दर्शन प्रक्रिया 45-50 मिनिटांची असते.
मोफत दर्शनाचीही आहे सुविधा
जर
तुम्हाला पैसे देऊन विशेष तिकीट घ्यायचे नसेल, तर मोफत दर्शनाचीही सुविधा
उपलब्ध आहे. मात्र, यासाठी गर्दीत उभं राहावं लागेल. दर्शनानंतर मिळणाऱ्या
प्रसादातील लाडूसाठी वेगळे शुल्क आकारले जाते.
ऑनलाइन दर्शन तिकीट कसे बुक कराल?
TTD च्या अधिकृत संकेतस्थळावर (Tirumala Tirupati Devasthanams) लॉगिन करा.
तुमच्या इच्छेनुसार दर्शनाचा पर्याय निवडा आणि मोबाईल क्रमांक वापरून लॉगिन करा.
दर्शनाची तारीख आणि वेळेचा स्लॉट निवडा.
नाव, वय, लिंग, राज्य, शहर आणि आधार क्रमांक भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर, पेमेंट करा (कोणत्याही माध्यमातून).
पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुमचे दर्शन तिकीट डाउनलोड करा.
बुकिंग करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
- तुमच्याकडे वैध फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट) असणे आवश्यक आहे.- तिकीट काउंटर दररोज सकाळी 5 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरू असतो किंवा तिकीट संपेपर्यंत चालू राहतो.- TTD दररोज १०,००० ते १५,००० तिकीटांचे वितरण करते.- पुढील दिवसासाठीही तिकीट मिळू शकते, त्यामुळे तुमचा प्लॅन आधीच ठरवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.