सांगली मतदारसंघात विविध ठिकाणी मंडलनिहाय रक्तदान शिबिरे; आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे नागरिकांना आवाहन
सांगली, दि. २२ जुलै २०२५ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे कुशल आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले अभ्यासू नेते आ. मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदा २۲ जुलै रोजी "महारक्तदान संकल्प" म्हणून एक भव्य आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत सांगली विधानसभा मतदारसंघात मंडलनिहाय रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून या शिबिरांचे नियोजन केले गेले आहे. मतदारसंघातील नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करणे, गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता वाढवणे आणि एक सामाजिक बांधिलकी जपणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
रक्तदान शिबिरांची ठिकाणे पुढीलप्रमाणे:
🔸 मेनन सांस्कृतिक हॉल, अभयनगर, सांगली🔸 महादेव मंदिर, बुधगाव🔸 किसान चौक, गणपती मंदिर, सांगली🔸 माळी मंगल कार्यालय, कुपवाड🔸 गणेश मंगल कार्यालय, मारुती चौक, सांगलीया शिबिरांमध्ये स्थानिक नागरिक, युवा कार्यकर्ते, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी व भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाविषयी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, “रक्तदान हे श्रेष्ठतम दान आहे. रक्ताची वेळेवर उपलब्धता अनेकांचे प्राण वाचवू शकते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक कार्यकर्त्यांशी नाळ जोडून असलेले नेते असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशी सामाजिक जाणीव असलेली कृती होणे गरजेचे आहे. सांगलीतील जनतेने या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा व सामूहिकपणे या सेवाकार्यात सहभागी व्हावे.”या महारक्तदान शिबिरांसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, विविध मंडळांमार्फत नागरिकांपर्यंत आवाहन पोहचवण्यात आले आहे. रक्तपेढ्यांचे सहकार्य, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी आणि यशस्वी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण सांगली मतदारसंघात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त ही सामाजिक बांधिलकी जपणारी एक प्रेरणादायी भूमिका ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.