पुणे शहरातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात नराधमाने बलात्कार केला. आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी फोटो काढून 'मी परत येईन', असा मेसेज केला. कोंढवा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एका गार्डेड सोसायटीमध्ये आरोपीने सुरुवातीला आपण कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला . त्यानंतर पीडित महिलेच्या फ्लॅटवर पोहोचल्यानंतर दरवाज्यात उभा राहून तुमचं कुरिअर आलं असल्याचे सांगितले. महिलेने हे कुरिअर आपले नाही, असा स्पष्ट नकार दिला. तरी देखील आरोपीने सही करावी यासाठी महिलेला जबरदस्ती केली.
सही करण्यासाठी दरवाजाला लावलेलं सेफ्टी डोअर महिलेला उघडावे लागले. याचा फायदा घेत आरोपीने महिलेच्या तोंडावर केमिकल स्प्रे फवारला त्यामुळे महिला बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे सांगितले जात आहे. बिन बोभाट ही सर्व घटना घडल्याने आरोपी निर्ढावलेल्या आरोपी पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला तसेच 'मी परत येईन' असा मजकूर पीडितेच्या मोबाईलवर टाईप करून करून ठेवला. ही घटना पूर्व परिसरातील उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने महिलांच्या सुरक्षेतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीने राजरोजपणे हुशारी दाखवत कुरियर बॉय असल्यास सांगत गेटवरील सुरक्षारक्षकांकडून आत इंट्री मिळवली.सुरक्षा रक्षकाने देखील त्याची फारशी चौकशी केली नसल्या तर प्राथमिक तपासात समोर आला आहे.
सीसीटीव्ही तपासले
कोंढवा
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते तपासले जात आहेत. सीटीव्हींच्या आधारे
आणि सोसायटीच्या आधारे आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक निर्माण करण्यात
आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.