Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! 'राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन...?'; 'या' बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Breaking News! 'राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन...?'; 'या' बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ


राज्याचं राजकारण गेले महिना-दीड महिना राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या भोवती फिरत आहे. महायुती सरकारचा हिंदीसक्तीचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाचा ठरला.


हे दोन्ही नेते येत्या 5 जुलै रोजी विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची धडाडती तोफ असलेल्या रामदास कदम  यांनी खळबळजनक दावा केला आहे.

माजी मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना-मनसे एकत्र आल्यास राज ठाकरेंचा राजकीय बळी जाणार असल्याचं विधान केलं आहे. आपण उद्धव ठाकरेंना जवळून पाहिलं असून राज यांनी यापूर्वी त्यांना एकत्रित येण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र, उद्धव यांनी त्यावेळी एका म्यानात दोन तलवार राहणार नसल्याचं स्पष्ट करत हा तो फेटाळल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राज ठाकरे यांनी आदित्यला निवडून दिले, पण उद्धव यांनी हे पथ्य पाळले का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं राज ठाकरेंना  निमंत्रण दिलं, मात्र व्यासपीठावर बसायला जागा दिली नव्हती. मी उठून बसायला जागा दिली होती.त्यांनी राज यांना अपमान करण्यासाठी बोलावलं होतं का?,असा सवालही कदम यांनी उपस्थित केला आहे.

'राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन...'

माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन केला होता,असा खळबळजनक दावा केला आहे.ते म्हणाले,कणकवलीला जातांना आम्हाला रास्ता बदलावा लागला. एसपीने मुंबईत परतण्यास सांगितले होते.हे सगळं राज ठाकरेंना विचारा,असंही कदम यांनी सांगितलं.

महाबळेश्वरमध्ये उद्धव ऐवजी राज यांची शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली असती तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता,असा दावाही रामदास कदम यांनी केला आहे.ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसेच याचवेळी त्यांनी मातोश्रीतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही,तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते असंही सांगितलं.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर रामदास कदम म्हणाले,उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडले, राज यांच्या मुलाला पाडलं, तेव्हा मराठी माणसाचं हित कुठं गेलं होतं? असा सवाल विचारतानात त्यांनी राज आपले चांगले मित्र असल्याचंही म्हटलं.

यावेळी शिवसेनेच्या रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मी, दिवाकर रावते,लीलाधर ढाकेंसारख्या लोकांना वापरून घेऊन सोडून दिले. आमची आमदारकी,मंत्रिपदं काढून घेतली.उद्धव ठाकरे हे माणसांचा वापर करुन घेतात असा हल्लाबोलही कदम यांनी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.