Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! 'ईव्हीएम' गडबडीबाबत निवडणूक आयोगाचा 'हा' महत्त्वाचा निर्णय

Breaking News!  'ईव्हीएम' गडबडीबाबत निवडणूक आयोगाचा 'हा' महत्त्वाचा निर्णय
 

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता. त्यानंतर काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, आता या उमेदवारांची फेरमतमोजणीची मागणी मान्य करण्यात आली असून फेर मतमोजणी होणार असल्याचं समोर आला आहे. त्यामुळे आता ईव्हीएम गडबडीबाबत 'दूध का दूध और पानी का पानी' होणार आहे. अशाप्रकारे फेरमतमोजणी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएममध्ये  गडबड झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण झाली असून याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जगताप म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघातून 2024 निवडणूक मी लढवली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर मतदार यादी, evm मशीन आणि व्हीव्हीपॅट बाबत माझे काही आक्षेप होते. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद देखील मागितली होती.

हडपसर मतदारसंघातून ज्या संशयास्पद 27 ईव्हीएम मशीन तपासणीसाठी 12 लाख 74 हजार रुपये निवडणूक आयोगाकडे भरले होते. त्यानंतर या 27 मशीन मोजण्यास निवडणूक आयोगाने सकारात्मकता दाखवली होती. मात्र, त्यांचे मूळ मतदान न मोजता मॉक पोल घेऊन त्या मशिनची पडताळणी करण्यात येणार होती. त्यासाठी जे मूळ मतदान झालं आहे ते मिटवण्यात येणार होतं. त्या विरोधात काही उमेदवार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. त्यानंतर आता या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे.

त्यानुसार आता 25 जुलैपासून हडपसर विधानसभा मतदारसंघातील ज्या 27 मशीन बाबत आम्ही आक्षेप नोंदवला आहे. त्याची मतमोजणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार ईव्हीएम मधील मतदान आणि व्हीव्हीपॅट मोजले जाणार आहेत. आठ दिवस ही प्रक्रिया सुरू असणार आहे.  या फेरमतमोजणीची सुरुवात ही हडपसर विधानसभा मतदारसंघापासून होणार आहे. नंतर टप्प्याटप्पाने आक्षेप घेतलेल्या सर्व मतदारसंघात होणार आहे.या प्रक्रियेतून जे काही चुकीचे प्रकार घडले असतील ते समोर येतील,असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.