Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी सरकारचा बंपर धमाका; सर्वसामान्यांना GST तून मिळणार मोठा दिलासा, काय-काय स्वस्त होणार?

मोदी सरकारचा बंपर धमाका; सर्वसामान्यांना GST तून मिळणार मोठा दिलासा, काय-काय स्वस्त होणार?
 

ग्राहकाने कोणतीही वस्तू खरेदी केली किंवा हॉटेलमध्ये जेवण केले तरी बिलावर वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीचे आकडे दिसतात. जीएसटीच्या या झटक्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून सातत्याने नाराजीचा सूर उमटतो. अनेकदा राजकीय पक्षांकडूनही हा मुद्दा ऐरणीवर आणला जातो. यापार्श्वभूमीवर मोदी सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सर्वसामान्यांना प्राप्तिकरातून सवलत दिल्यानंतर आता जीएसटी दरांमध्येही कपात केली जाऊ शकते. प्रामुख्याने सर्वसामान्यांना दैनंदिन आयुष्यामध्ये आवश्यक असलेल्या वस्तूंवर कर कमी केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी जीएसटीचे तीन नवे स्लॅब करून 12 टक्केचा स्लॅब रद्द करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे वृत्त आहे.

सरकारने हा निर्णय घेतल्यास अनेक वस्तूंचे दर कमी होणार आहेत. त्यासाठी सरकारकडून काही पर्यायांवर विचार सुरू असल्याचे समजते. पहिला पर्याय म्हणजे 12 टक्के जीएसटी स्लॅबमधील बहुतेक वस्तूंना 5 टक्के स्लॅबमध्ये टाकणे आणि दुसरा पर्याय म्हणजे 12 टक्केचा स्लॅब पूर्णपणे समाप्त करणे. मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

 
महसूलावर परिणाम
सरकारने 12 टक्के जीएसटी स्लॅब रद्द केला किंवा त्यातील अनेक वस्तू 5 टक्केंच्या स्लॅबमध्ये आणल्या तर सरकारच्या महसूलावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारवर तब्बल 40 ते 50 हजार कोटींचा बोजा पडेल, असा अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकार तयार असले तरी काही राज्यांकडून विरोध केला जाऊ शकतो.

जीएसटी दरांमध्ये कपात केल्यास उत्पादनांची विक्री वाढेल, त्याने आर्थिक बोजा कमी होईल, असाही सरकारचा विचार आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतेच संकेतही दिले होते. जीएसटी परिषदेची पुढील बैठक याच महिन्यात होण्यात होण्याची शक्यता आहे. त्याआधीच राज्यांना मन वळवून बैठकीत दरांमध्ये कपातीवर शिक्कामोर्तब करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असू शकतो.
कपात झाल्यास या वस्तू होतील स्वस्त...

कृषी अवजारे, स्टेशनरी, व्हॅक्सीन, टाईल्स, 1 हजारांपुढील कपडे, 500 ते 1 हजार रुपयांदरम्याच्या चप्पल-बूट, इस्त्री, गीझर, शिलाई मशीन, छत्री, टूथ पेस्ट व पावड, कुकर, भांडी, सायकल, वॉशिंग मशिन आदी वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. या वस्तूंवर सध्या 12 टक्के जीएसटी आकारला जातो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.