मानेवर दिसतात Liver सडण्याची 4 लक्षणं, 5 सवयी सोडल्या नाहीत तर आयुष्यभराची कमाई जाईल डॉक्टरच्या खिशात
यकृत हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अन्न पचवणे, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि शरीर स्वच्छ ठेवणे अशी अनेक महत्त्वाची कार्ये लिव्हर करते. लिव्हरचे आजार सुरुवातीला लक्षणे अजिबात दाखवत नाहीत. उदाहरणार्थ, फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस बी किंवा अल्कोहोलशी संबंधित आजार अनेक वर्षे कोणत्याही लक्षणांशिवाय लपलेले राहतात. लक्षणे दिसेपर्यंत मात्र लिव्हर खूप खराब झालेले असते, ज्याला सिरोसिस म्हणतात. एकदा सिरोसिस झाला की, तुम्ही मद्यपान सोडले किंवा वजन कमी केले तरीही यकृत सामान्य स्थितीत परत येऊ शकत नाही. लिव्हरच्या नुकसानाची अनेक लक्षणे आहेत आणि यापैकी काही लक्षणे तुमच्या मानेवर दिसू शकतात. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. भास्कर नंदी तुम्हाला या लक्षणांबद्दल आणि यकृत निरोगी ठेवण्याचे मार्ग सांगत आहेत, जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
मानेवर अचानक काळेपणा
मानेवर काळेपणा दिसत असल्यास मानेचा रंग अचानक काळसर होणे, जसे की ब्राऊन किंवा काळी त्वचा, तसंच त्वचा जाड होणे अशी लक्षणे दिसत असतील तर ही फॅटी लिव्हर किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सची लक्षणे असू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला लठ्ठपणा, मधुमेह किंवा पीसीओडी असेल तर त्यांच्यामध्ये ही लक्षणे दिसू शकतात.
मानेवर खाज येणे
जर लिव्हरच्या पित्तनलिका ब्लॉक झाल्या तर शरीरात पित्त क्षार जमा होतात ज्यामुळे संपूर्ण शरीरात खाज येऊ शकते, विशेषतः मान, पाठ आणि हात आणि पायांमध्ये. त्वचेवर ओरखडेदेखील दिसू शकतात. इतकंच नाही तर जेव्हा लिव्हरच्या त्रासामुळे कावीळ होते तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर आणि डोळ्यांवर तसेच मानेच्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा पिवळी दिसू शकते. जर तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लिव्हर का खराब होते?
लठ्ठपणामुळे Liver चे सर्वाधिक नुकसानहोते. याशिवाय, मद्यपान, बाहेरील जंक फूड खाणे, झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे लिव्हर लवकर खराब होऊ शकते. तुम्ही नियमित मद्यपान करत असाल वा तुम्हाला रोज बाहेर खाण्याची सवय असेल तर वेळीच याला आवर घालणे गरजेचे आहे.
कसे ओळखावे संकेत?
लिव्हर खराब होतंय त्याचे संकेत काय आहेत पोटाच्या उजव्या बाजूला हलके वेदना किंवा जडपणा, भूक न लागणे, खाण्याची इच्छा न होणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा आणि वजन न वाढणे यासारख्या काही लक्षणांवरून तुम्ही तुमच्या Liver च्या स्थितीचा अंदाज लावू शकता. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळली तर एकदा अल्ट्रासाऊंड आणि यकृत कार्य चाचणी (LFT) नक्की करा.
Liver Detox कसे करावे?
काही गोष्टी लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. यामध्ये ब्रोकोली, पालक, अंडी, फायबरयुक्त पदार्थ आणि पाणीयुक्त पदार्थ यासारख्या हिरव्या भाज्यांचे सेवन करणे समाविष्ट आहे. याशिवाय, तुमचे वजन नियंत्रित करा, अल्कोहोल पिणे थांबवा, वेळोवेळी लिव्हरसाठी योग्य चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड करा.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.