Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्करोग, अंधत्व अन् अर्धांगवायू... 2030 पर्यंत इतिहासजमा होतील; मेडिकल विद्यार्थ्याचा दावा

कर्करोग, अंधत्व अन् अर्धांगवायू... 2030 पर्यंत इतिहासजमा होतील; मेडिकल विद्यार्थ्याचा दावा
 

मेडिकल सायन्स सध्या इतकं अद्ययावत झालंय की काही असाध्य आजारांवर उपचारही आता शक्य झाले आहेत. तर काही आजारांचं समूळ उच्चाटन करण्यापर्यंत मेडिकल सायन्सने यश मिळवलंय. सध्या एका विद्यार्थ्यानं केलेल्या दाव्याची चर्चा सर्वत्र होत आहे. बुडापेस्टमधील एका मेडिकलच्या विद्यार्थ्यानं कॅन्सर, अंधत्व, अर्धांगवायू सारखे आजार २०३० पर्यंत नाहीसे होतील असा दावा केलाय. अॅडव्हान्सड लसी, आधुनिक उपचारपद्धती आणि तंत्रज्ञानाची मदत शास्त्रज्ञ घेत आहेत असंही म्हटलंय.

मेडिकलचा विद्यार्थी असलेल्या ख्रिस क्रॉयसॅन्थूने म्हटलं की, तीन गंभीर आजार जे २०३० पर्यंत समूळ नष्ट होण्याची अपेक्षा आहे. यात पहिला क्रमांक कॅन्सरचा लागतो. तुम्ही केमोथेरपी विसरा. संशोधक रोगप्रतिकारक शक्तीला ट्युमरवर हल्ला करण्यासाठी mRNA कॅन्सरच्या लसींचा वापर केला जात आहे. यावर पर्सनलाइज लस, अनुवांशिक एडिटिंग अन् लहान औषधं सध्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते कॅन्सर लवकरच उपचारयोग्य होईल. तो जीवघेणा राहणार नाही.

दुसऱ्या क्रमांकावर अंधत्व आहे. जीन एडिटिंग आणि स्टेम सेल्स यामुळे रेटिनल आजार असलेल्या रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळत आहे. याआधी दोन अंध रुग्णांना दृष्टी मिळण्यास मदत झालीय. प्राइम एडिटिंग नावाच्या नव्या तंत्रज्ञानामुळे जेनेटिक म्युटेशनवर उपचार शक्य आहेत. अंधत्वानंतर आणखी एक आजार म्हणजे अर्धांगवायू. चीनमध्ये पू्र्ण अर्धांगवायू असलेले दोन लोक हे मेंदू प्रत्यारोपण आणि स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशननंतर पुन्हा चालू लागले आहेत. पाठीच्या दुखापतीनंतरही मेंदूतून पायांना सिग्नलही पाठवले गेले असंही या विद्यार्थ्याने सांगितलंय.

दरम्यान, मेडिकल विद्यार्थ्याच्या पोस्टवर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरनं विज्ञान अद्भुत असल्याचं म्हटलंय. तर एकाने म्हटलं की, औषधातून, कर्करोगावर उपचाराच्या नावाखाली जोपर्यंत पैसे कमावले जातायत तोपर्यंत कर्करोगावर कधीच उपचार होणार नाही. तर एकानं म्हटलंय की, मधुमेहसुद्धा लवकरच बरा होईल. चीनच्या संशोधकांनी मधुमेह बरा करण्याचा मार्ग शोधलाय. 
 
भारतात कर्करोग हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. कर्करोगाच्या एकूण रुग्णांमध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात कर्करोगाने दर पाच व्यक्तींमागे तिघांचा मृत्यू होतो. वृद्ध, प्रौढांमध्ये कर्करोगाची शक्यता वाढते. वयोगट आणि मृत्यूदर यानुसार आजाराच्या परिणामाचे विश्लेषण अनव्हेलिंग द कॅन्सर एपिडेमिक इन इंडिया : अ ग्लिम्प्स इनटू ग्लोबोकॅन २०२२ अँड पास्ट पॅटर्न या अभ्यासात करण्यात आलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.