रिक्षाचालकाने प्रवाशाला एखाद्या ठिकाणी सोडण्यास होकार देणं म्हणजेच रिक्षावाला 'हो' म्हणणे ही शहरी भागातील प्रवासादरम्यानची सर्वात कठीण गोष्ट असते असं मस्करीत म्हटलं जातं. खरं तर रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचा अनुभव आपल्यापैकीही अनेकांनी घेतला आहे. मात्र एका मराठी अभिनेत्रीलाही नुकताच रिक्षाचालकाचा असा धक्कादायक अनुभव आला आहे. या अभिनेत्रीनेच हा अनुभव शेअर केला असून रिक्षाचालकाचा व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
नेमकं कोणासोबत आणि काय घडलं?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधरला रिक्षाचालकाच्या मुजोरीचा अनुभव आला आहे. शनिवारी घाटकोपर मेट्रो स्थानकावरून आदिती घरी जाण्यासाठी बराच वेळ रिक्षाची वाट बघत होती. तिने अॅप्लिकेशनवरुन रिक्षा बूक करण्याचा प्रयत्न केला मात्र रिक्षा उपलब्ध नव्हत्या. तिच्यासोबत इतरही अनेक जण रिक्षाची वाट बघत असताना तिच्या घराजवळच राहणाऱ्या एका महिलेला रिक्षा मिळाली. या महिलेने आदितीलाही सोबत घेतले. मात्र रिक्षाचालकाने याला विरोध दर्शवित आदितीला घेऊन जाण्यास नकार दिला आणि त्याने त्यांना रिक्षामधून उतरवले.
अतिरिक्त पैसे देण्याची तयारी
आदिती यांनी मीटरप्रमाणे जे होईल त्याशिवाय आणखी हवे तर वर 50 रुपये देण्याची तयारीही दर्शविली. मात्र रिक्षाचालकाने फक्त एकीलाच घेऊन जाणार दोघींना नेणार नाही असा पवित्र कायम ठेवला.
काय करायचं ते कर म्हणत दाखवला माज
एवढ्यावरच न थांबणा वर उर्मटपणा करत जाब विचारला असता, 'काय करायचं ते कर, मी जाणार नाही', अशी मग्रुरी केली. हा सर्व प्रकार आदितीने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे. अखेर दुसरी रिक्षा बऱ्याच वेळाने मिळली आणि अदिती घरी गेली. अखेरपर्यंत रिक्षाचालकाने तिला होकार दिलाच नाही.
गर्दीच्या वेळी रिक्षाचालकांची मुजोरी
केवळ घाटकोपरच नाही तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या सर्वाच स्थानकांजवळ गर्दीच्या वेळी रिक्षाचालक वाटेल तो भाव सांगत भाडी भरण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा अशा ठिकाणी पोलीस तैनात असतात. मात्र ते फारशी कठोर कारवाई करताना दिसत नसल्याने मुजोर रिक्षाचालकांचे फोफावते. अनेकदा रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळतं. मुजोर रिक्षाचालकांविरोधात अनेकदा अनेकांनी आवाज उठवूनही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. याच रिक्षाचालकांच्या मुजोरीची नवी शिकार ठरली ती अभिनेत्री अदिती सारंग! अनेकांनी अदितीचा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. रिक्षाचालकांची मुजोरी उतरवली पाहिजे असं अनेकांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.