Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! रॅलीत घुसून तरुणाने राहुल गांधींना केलं Kiss, सुरक्षा रक्षकांनी तरुणाला फटकावलं; सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक

Big Breaking! रॅलीत घुसून तरुणाने राहुल गांधींना केलं Kiss, सुरक्षा रक्षकांनी तरुणाला फटकावलं; सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक
 

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी बाईक रॅलीत भाग घेतला होता. यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली. पूर्णिया येथे बाईक रॅली दरम्यान एक तरुण रॅलीत घुसला आणी त्याने राहुल गांधींना किस केले. त्यानंतर राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तातडीने त्या तरुणाला बाजूला केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पूर्णिया येथे घडली घटना
समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्णिया येथे मतदार हक्क यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक झाली. राहुल गांधी बाईक रॅलीत बुलेटवरून जात होते, बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम त्यांच्या मागे बसले होते. रॅली सुरु असताना एक तरुण राहुल गांधींच्या बाईकजवळ आला आणि त्याना किस केलं. त्यानंतर राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकाने त्या तरुणाला पकडून त्याच्या कानाखाली मारली. आता त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 
 
मतदार हक्क यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केला आहे. 'कोट्यवधी बिहारी लोकांचा मतचोरी झाल्याचा आमच्या आरोपावर विश्वास आहे. त्यामुळेच आमच्या यात्रेला मोठा पाठिंबा मिळत आहे. योग्य मतदार यादी देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, मात्र महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये त्यांनी हे काम केले नाही. निवडणूक आयोगाने आपला दृष्टिकोन बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, आता आम्ही बिहारमध्ये मत चोरी होऊ देणार नाही.'

मतदार हक्क यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली मतदार हक्क यात्रा सुरु आहे. राज्यातील हजारो लोक या यात्रेत सहभागी झाले आहेत. पूर्णियामध्ये राहुल यांना बाईक चालवताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साहही वाढला आहे.

निवडणूक आयोग हा गोदी आयोग बनलाय - तेजस्वी यादव
तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'आता निवडणूक आयोग निवडणूक आयोग राहिला नाही, तो 'गोदीआयोग' बनला आहे. तो भाजपचा एक सेल आणि कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. त्यामुळे आम्ही लोकशाही संविधान आणि मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे.
 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.