डोनाल्ड ट्रम्प हे संपूर्ण जगभरात चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी टॅरिफचा कहर केला. फक्त इतर देशांकडूनच नाही तर चक्क अमेरिकेतूनही त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात लोक आवाज उठवताना दिसत आहेत. त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. ट्रम्प यांनी आता मेक्सिकोमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या गुप्त करारावर सह्या केल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्याने त्याचा थेट भारतीय अर्थव्यवस्थेतवर परिणाम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर थेट भाष्य केले आहे.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे आलीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पहिली पत्नी इवानाचे शव गोल्फ कोर्समध्ये दफन केले. आता सांगितले जाते की, यामागे त्यांचे मोठे कमाईचे कारण होते आणि फायदा. त्यामुळेच त्यांनी इवानाचे शव तिथे दफन केले. ट्रम्प याची पहिली पत्नीचे नाव इवाना असून तिचे निधन जुलै 2022 मध्ये झाले होते. यानंतर इवानाचे शव डोनाल्ड ट्रम्पने गोल्फ कोर्समध्ये दफन करण्याचा निर्णय घेतला.इंस्टाग्रामवर इवाना ट्रम्प यांच्या कब्रचा फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये हैराण करणारा दावा करत सांगण्यात आले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे टॅक्स वाचवण्यासाठी केले आहे. पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, इवाना यांचे शव इथे दफन करण्यात आले, नाही इथे कोणते फुल आहेत नाही कोणते मेमोरियल फक्त इथे केवळ कब्र आहे. मुळात म्हणजे इवाना यांना इथे दफन करण्यामागे मोठे कारण आहे आणि फायदा आहे, नियमांचा गैरफायदा घेण्यात आलाय.न्यू जर्सीच्या नियमानुसार, एक कब्र बनवल्याने ती जमीन कब्रस्थानमध्ये वर्ग होते. असे झाल्याने या जमिनीवर प्रॉपर्टी टॅक्स परचेसिंग टॅक्स आणि इनकम टॅक्स नाही लागत. या पोस्टच्या दाव्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी या जमिनीला नॉन प्रॉफिटेबल कब्रस्थाननुसार नोंदणी केलीये. असे करून डोनाल्ड ट्रम्पने संपूर्ण गोल्फ कोर्सला फ्री टॅक्स केले आहे. या जमिनीच्या एका कोपऱ्याला त्याने पत्नीच्या शवला दफन करून संपूर्ण जमिनीवर कब्जा केलाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.