घरमालकांच्या डोक्याचा व्याप आता कमी होणार? कारण हाऊसिंग सोसायट्यांमध्ये भाड्याने दिल्या जाणाऱ्या घरांबाबत उपनिबंधकांनी महत्त्वाचा निर्णय दिलाय.. फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर घरमालकाकडून नॉन-ऑक्युपन्सी शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही, असे निर्देश सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी दिलेत..
मुंबईच्या शीव, प्रतीक्षा नगर परिसरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदाकडून बिल्डिंग डेव्हलपमेंट फंडाच्या नावाखाली 5000 रुपये आकारले जात होते. हा निर्णय चुकीचा असल्याचे उपनिबंधकांनी सांगितले. आणि वादग्रस्त रक्कम दोन महिन्यांत तक्रारदाराच्या मासिक देखभाल बिलांमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच नॉन-ऑक्युपन्सी शुल्क म्हणजे घर भाड्याने दिल्यावर आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क 10% पेक्षा जास्त नसावे असेही निर्देश दिलेत. या निर्णयामुळे हाऊसिंग सोसायट्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसेल तसेच घरभाड्याने देणाऱ्या घरमालकांना अतिरिक्त शुल्काचा बोजाही झेलावा लागणार नाही..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.