मुंबई: राज्यातील २६ हजार ३५४ पैकी पाच हजार १३४ रुग्णालयांनी महाराष्ट्र नर्सिंग कायद्यातील नियमांचे पालन केले नसल्याचे, तपासणीत आढळून आले आहे. या रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक, सर्व हेल्पलाइन क्रमांक आदी माहिती लावणे बंधनकारक होते. मात्र यातील अनेक बाबींची पूर्तता केली नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
चौकशीनंतर पुढील ३० दिवसात त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित रुग्णालयाचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र नर्सिंग कायद्यानुसार नोंदणी झालेल्या रुग्णालयांची तपासणी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार राज्यातील सुमारे २६ हजार रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाच हजार १३४ रुग्णालयांनी
दिलेल्या सूचना व नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे. त्या
सर्वांना त्रुटी पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या रुग्णालयांवर पुढील कारवाई करण्यात
येणार आहे.
या आहेत तक्रारी
मनमानी पद्धतीने उपचारांचा खर्च आकारणेउपचाराच्या खर्चाची रुग्णांना आणि नातेवाइकांना माहिती न देणेसुविधांचा अभाव, मान्यता नसणारे उपचार करणे, प्राथमिक सुविधांचा अभावरुग्णालयात अपुरी सुरक्षा व्यवस्थामंडळाचे नाव - नोटीस देण्यात आलेली रुग्णालयेमुंबई मंडळ, ठाणे - २१५पुणे - १६५०नाशिक - ५८४छ. संभाजीनगर - ९०१कोल्हापूर - ४२५लातूर - ५८९अकोला - ४०९नागपूर - ३६१
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.