सांगली जिल्हा परिषदेत लाडक्या बहिणींना प्रशासनाच्या नोटीसा..., सरकारी कर्मचारी महिलांचे दाबे दाणाणले
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर राज्यातील 2 कोटीहून अधिक महिलांनी लाभ घेतली आहे. पण आता विविध सरकारी योजना आणि निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्याचा धडाकाच शासनाने लावला आहे. अशातच राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता सरकारने कारवाईचा बडगा उगारण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास विभाग आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या आदेशा प्रमाणे जिल्हा परिषदेतील नऊ लाभार्थ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे सरकारी कर्मचारी महिलांचे दाबे दाणाणले आहेत.
जिल्ह्यातील तीन ग्रामसेवक, पाच आरोग्य सेवक आणि एका शिपाई अशा नऊ महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.सरकारी सेवेत असतानाही लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातील महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. अशा महिला कर्मचाऱ्यांचा शोध महिला व बालविकास विभाग घेत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या सेवेत असलेल्या राज्यातील 1183 महिला कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यात सांगली जिल्हा परिषदेतील नऊ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार शासनाने कारवाई सुरू केली आहे.सरकारी सेवेत असतानाही त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज केल्याचे आणि योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. महिला व बालविकास विभागाने या महिलांची यादी सर्व जिल्हा परिषदांना पाठवली आहे. शासनाकडून 16 महिला कर्मचाऱ्यांची यादी आली होती. त्यानुसार तपासणी केली असता यातील सात कर्मचारी सातारा जिल्हा परिषदेचे असल्याचे समोर आले. उर्वरित नऊ महिला सांगली जिल्हा परिषदेच्या असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात येत आहे. त्याच्याकडून खुलासा घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.