Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील २४ जणं उत्तराखंडमध्ये बेपत्ता; १९९०च्या १०वीच्या बॅचमधील मित्र-मैत्रीण बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले अन्...

पुण्यातील २४ जणं उत्तराखंडमध्ये बेपत्ता; १९९०च्या १०वीच्या बॅचमधील मित्र-मैत्रीण बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले अन्...
 

उत्तराखंड: उत्तराखंडमधील धराली इथं ढगफुटीनंतर भीषण दुर्घटना घडलीय. माती अन् चिखलासह पाण्याचा मोठा प्रवाह पर्वतावरून खाली आला. यामुळे धराली गावातील हॉ़टेल्स, होम स्टे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, पुण्यातील काही पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिलीय. सुप्रिया सुळे यांनी २४ पर्यटकांची यादी दिली असून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नसल्याचं म्हटलंय.

धरालीत घडलेल्या घटनेनंतर २४ जणांशी संपर्क झालेला नाही. मंचर इथले हे सर्वजण असून ते उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं कुटुंबिय तणावात आहेत. याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना २४ जणांची माहिती दिली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील १९९० सालच्या १० वी च्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक समूह पर्यटनासाठी १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काल सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आंबेगावमधील सर्वजण दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्या भागातच असल्याचे सांगितले जात आहे. काल या समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून "आम्ही सर्वजण सुखरूप आहोत," असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. 
काल सकाळी 11 वाजता या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले होते. मात्र कालपासून चौघाचेही फोन लागत नसल्याची कुटुंबियांनी सांगितलंय. याशिवाय विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे सोलापुरातील चौघे तरुण उत्तराखंडला गेले होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघाची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय. NDRF ने सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार जीवितहानी झालेल्या मध्ये सोलापूरच्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नसल्याचे सांगितल्याने घाबरण्याचे कारण नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.