Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शहांनी अटक होण्यापूर्वी खरंच दिला नव्हता का राजीनामा? किती महिने होते जेलमध्ये?

अमित शहांनी अटक होण्यापूर्वी खरंच दिला नव्हता का राजीनामा? किती महिने होते जेलमध्ये?
 

लोकसभेत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास त्यांना पदावर हटविण्याबाबतची तरतुद असलेले विधेयक सादर केले. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतच शहांच्या अटकेच्या मुद्दा काढत त्यांना डिवचले. शाह गुजरातचे गृहमंत्री असताना एका प्रकरणात त्यांना अटक झाली होती.

अमित शाह यांनी विधेयक सादर करताना अटक झाल्यानंतर नेत्यांनी नैतिकता दाखवत पद सोडायला हवे, असे विधान केले होते. त्यावर बोलताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी पलटवार करताना तुम्ही गुजरातचे गृहमंत्री असताना अटक झाल्यानंतर त्यावेळी नैतिकतेचे पालन केले होते का?, असा सवाल केला. त्यावर शहांनी आपण अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याचे खडसावून सांगितले.

कोणत्या प्रकरणात अटक?
अमित शहा हे 2005 मध्ये गुजरातचे गृहमंत्री होते. त्यावेळी 26 नोव्हेंबर 2005 रोजी अहमदाबादमध्ये गँगस्टर सोहराबुद्दीनचे एन्काऊंटर करण्यात आले होते. गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी हे एन्काऊंटर केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आधी सोहराबुद्दीनचा उल्लेख दहशतवादी करण्यात आला होता. त्यानंतर तो गँगस्टर असल्याचे सांगण्यात आले. एन्काऊंटरनंतर पत्नीचाही मृत्यू झाला होता.

या प्रकरणातच गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राजस्थानचे मंत्री गुलाबचंद कटारिया यांचे नाव सीबीआयने आरोपपत्रात घातले होते. या प्रकरणात अमित शहांना अटक झाली होती. त्यांनी अटक होण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला होता. मोदींनी राजीनामा स्वीकारला होता. त्यानंतर 26 जुलै 2010 मध्ये अमित शहांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांना कोर्टाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. अमित शाह जवळपास तीन महिने तुरुंगात होते. ते 21 ऑक्टोबर 2010 मध्ये जामीनावर तुरुंगातून बाहेर आले. पण त्यांना अनेक महिने गुजरातबाहेरच राहावे लागले. कोर्टाने 2014 मध्ये शहा व कटारियांसह सर्व 16 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपींनी कट रचल्याचा गुन्हा सिध्द झाला नव्हता.

आता अमित शाह यांच्याकडूनच पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना अटक झाल्यानंतर 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पद गमवावे लागणार असल्याचे विधेयक लोकसभेत सादर केले आहे. त्यासाठी संविधानात दुरूस्ती केली जाणार आहे. त्यामुळे हे विधेयक महत्वाचे मानले जात आहे. विरोधकांनी विधेयकावर आक्षेप घेत केवळ विरोधकांची सरकार पाडण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप केला जात आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

Q1: अमित शाह यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली होती?
A: 2005 च्या सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणात त्यांना अटक झाली होती.

Q2: त्यांनी राजीनामा केव्हा दिला होता?
A: अटक होण्यापूर्वीच त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Q3: शाह किती महिने जेलमध्ये होते?
A: ते जवळपास तीन महिने तुरुंगात होते.

Q4: त्यांची निर्दोष मुक्तता केव्हा झाली?
A: 2014 मध्ये कोर्टाने त्यांना आणि इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.