उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून गायब आहेत. ते नेमके कुठे आहे? त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे खासदार सांगत आहेत. खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या विषयी काळजी व्यक्त केली होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत जगदीप धनखड कुठे आहेत याची विचारणा केली आहे.
'आपल्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत नक्की काय घडले आहे? ते कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? देशाला या प्रश्नांची खरी माहिती मिळाली पाहिजे. दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले असून ते सुरक्षित नाहीत.', असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.