किर्लोस्करवाडी :- कर्मवीर पतसंस्थेने केलेली प्रगती ही सभासदांना अभिमान वाटावी अशी असून कर्मवीर पतसंस्थेने आदर्श कामकाज केल्यामुळेच संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केल्याचे मत संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या रामानंदनगर येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर संपन्न झाले. या वेळी सभासदांशी संपर्क साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. कर्मवीर पतसंस्थेने ठेवी आणि कर्जाच्या
माध्यमातून सभासद आणि समाजासाठी मोठे योदगान दिलेले आहे आणि या पुढे ही
त्याच विश्वासाने सेवा देण्याची ग्वाही चेअरमन यांनी दिली.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम यांनी केले. संस्थेच्या कार्याची दिशा त्यांनी विषद केली. संस्था ६४ शाखा मधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित असल्यामुळे ठेवी कर्ज भागभांडवल यासाठी सभासदांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सभासदांचे त्यांनी आभार मानले. ६८००० सभासदांचे हे विस्तारीत कुटूंब असल्याचे त्यानी नमुद केले. यावेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे शाखेच्यावतीने सल्लागार सदस्यानी स्वागत केले.या कार्यक्रमास शाखा रामानंदनगरचे सल्लागार श्री. राजारामबापू नाभिराज पाटील श्री. प्रमोद मिठारी, श्री. संदिप मिठारी, संजयकुमार चौगुले ऋतुराज पाटील, सावंतपुरचे सरपंच प्रल्हाद जाधव, जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन शरदकाका शिंदे, बी. एस. जाधव सर, पी.टी. पवार सर, डॉ. जी. एम. सुतार, माजी सरपंच प्रशांत नलवडे, डॉ. मुजाप्पा, डॉ. राजेंद्र शेंडगे, अख्तर पिरजादे, राजेंद्र बिडवे, वासिम मुल्ला, गणेश पाटील, एस. वाय पाटील सर, आर.एम. पाटील, रोहीत टोणपे, प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. श्री. संजयकुमार चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील, डॉ. अशोक आण्णा सकळे श्री. ए. के. चौगुले ( नाना) डॉ. रमेश वसंतराव ढबू. श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, डॉ. एस. बी. पाटील (मोटके ). तज्ञ संचालक श्री. लालासाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद, सेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार शाखाधिकारी संतोष इंगलजे यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.