मुस्लिम विक्रेत्याकडून गणेशमूर्तीची खरेदी, सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल; भाजप मंत्री आशिष शेलार म्हणाले...
राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह अन् आनंद आहे. वेगवेगळ्या आकर्षक शैलीच्या असंख्य मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध आहे. या गणेश मूर्तींची भक्तीभावानं खरेदी-विक्री सुरू आहे. असंख्य हातांनी बनवलेल्या या गणेशमूर्ती वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांच्या घरी जात आहेत. यातच एका गणेश भक्ताने मुस्लिम
विक्रेत्याकडून गणेशमूर्ती खरेदी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर
करत, ऐक्याचा संदेश दिले. परंतु तो व्हिडिओवरून संबंधितांना प्रचंड ट्रोल
करण्यात आलं. भाजपचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावर सावध
प्रतिक्रिया देताना सरकार संविधान मानते, पण मुद्दामहून डिचवण्याचे प्रकार
कोणी करू नये, असं म्हटलं आहे.
भाजप मंत्री आशिष शेलार यांची 'सकाळ माध्यम समूहा'च्या साम मराठी वृत्तवाहिनीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट', या सदरात मुलाखती घेण्यात आली. यात एका गणेश भक्तानं मुस्लिम विक्रेत्याकडून गणेशमूर्ती घेतल्याचा फोटो समाज माध्यमावर शेअर केल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. यानंतर शेवटी वैतागून संबंधितानं तो फोटो समाज माध्यमांवरून हटवला. यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून काय भूमिका आहे, असा प्रश्न आशिष शेलार यांना करण्यात आला.
आशिष शेलार यावर म्हणाले, "जाती, धर्म, भाषा, भेद, लिंग यावरून कोणीही कुणाच्या भावना दुखवू नये. ही सरकाची देखील भूमिका आहे. हे संविधानाला देखील अभिप्रेत आहे. यात दोन्ही बाजूने समतोल साधला गेला पाहिजे. विनाकारण कुणीही कुणाला डिवचू नये." 'म्हणणाऱ्याने मुद्दाम कुणाला डिवचू नये, मी घेतोय आहे म्हणून, घेतल्यानंतर घेतली तर, काय झालं? असे वाटणारे दुसऱ्या बाजूला असले, तर बरं!', असं माझं मत असल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.मुस्लिमांकडून गणेशमूर्तीच घेऊ नका, असे म्हटलं जात आहे. यावर बोलताना आशिष शेलार यांनी, 'अशा प्रकारची भूमिका सरकारची नव्हे. असूच शकत नाही. संविधानातच नाही. त्यामुळे सर्वांना मर्यादा पाळल्या पाहिजेत. सांगणाऱ्याने देखील सांगायची गरज होती का? हा माझा आरोप नाही. पण दुसऱ्या बाजूने एखाद्यानं सांगितलं तर, ठीक आहे', अशी दोन्ही बाजूने भूमिका असू शकते, असे म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.