Breaking News ! तुमच्याकडे अजूनही 2,000 रुपयांच्या नोटा आहेत का? बदलण्याची शेवटची संधी; कशा बदलता येणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून हळूहळू मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी या नोटांचा एकूण साठा 3.56 लाख कोटी रुपये इतका होता. आता जवळपास सव्वा वर्षानंतर मनीकंट्रोलच्या अहवालानुसार फक्त 6,017 कोटी रुपये किमतीच्या नोटा चलनात आहेत. याचा अर्थ, 98.31% नोटा बँकिंग सिस्टीममध्ये परत आल्या आहेत. तरीसुद्धा अनेक नागरिकांच्या घरी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असण्याची शक्यता आहे. तुम्हीही त्यापैकी एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
आता 2000 रुपयांच्या नोटा कशा बदलायच्या?
RBI ने 9 ऑक्टोबर 2023 पासून सर्व बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सेवा बंद केली आहे. त्यामुळे आता या नोटा बदलण्यासाठी किंवा बँक खात्यात जमा करण्यासाठी फक्त RBI च्या 19 इश्यू ऑफिसेसमध्येच सुविधा उपलब्ध आहे.
हे RBI इश्यू ऑफिसेस पुढील शहरांमध्ये आहेत: अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटणा आणि तिरुवनंतपुरम.
तुम्ही या ठिकाणी स्वत: जाऊन नोटा जमा करू शकता, किंवा तुमच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करून घेऊ शकता.
पोस्टाच्या माध्यमातूनही नोटा बदलणे शक्य
जर तुम्ही दूर गावांमध्ये राहत असाल आणि RBI ऑफिस पर्यंत पोहोचणं शक्य नसेल, तर पोस्ट विभागाचं साहाय्य घेऊन तुम्ही या नोटा संबंधित RBI इश्यू ऑफिसला पाठवू शकता. त्यासाठी एक अर्जपत्र, तुमच्या बँक डिटेल्स, नोटांची माहिती, आणि ओळखपत्राची झेरॉक्स जोडून पाठवावी लागेल. RBI ला नोटा मिळाल्यावर संबंधित रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल. ही सुविधा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगी आहे.2000 रुपयांच्या नोटा नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदी दरम्यान प्रथम आणल्या गेल्या होत्या. त्यावेळी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. पण 2018-19 पासून RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची छपाईच बंद केली. कारण 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची पुरवठा पुरेसा झाला होता. त्यामुळे 2000 ची नोट फार उपयोगाची राहिली नव्हती.RBI च्या "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत कमी वापरल्या जाणाऱ्या आणि उच्च मूल्याच्या नोटा हळूहळू बाद करण्यात येतात. या धोरणानुसारच 2000 ची नोट देखील आता बंद केली आहे. जर तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील, तर आजच RBI च्या इश्यू ऑफिस किंवा पोस्ट विभागाच्या माध्यमातून त्या जमा करा. कारण जरी या नोटा कायदेशीर वैध असल्या, तरी त्या व्यवहारात जवळपास बाद झाल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.