कवठेमहांकाळ : आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जे. डी. म्हेत्रे यांना 1 कोटी 20 हजारांचा गंडा घालणार्या टोळीचा मास्टरमाईंड महेश रघुनाथ शिंदे (वय 47, रा.घाटकोपर, मुंबई, मूळ रा. कचरे सोसायटी, जयसिंगपूर, ता. शिरोळ) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केले.
दि. 14 सप्टेंबररोजी रात्री डॉ. म्हेत्रे यांच्या घरी एका महिलेसह चौघांनी बनावट आयकर अधिकारी असल्याचे सांगून प्रवेश केला. घराची झडती घेत म्हेत्रे यांच्याकडील 1 किलो 410 ग्रॅम सोने आणि पंधरा लाख साठ हजार रुपये रोख, असा एकूण 1 कोटी 20 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी यापूर्वी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. काही मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते. महेश शिंदे हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, तो गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. मात्र, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने रविवारी रात्री त्याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, गुरुवार दि. 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.