Big Breaking! "राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी नेते आणि सध्याचे भाजप प्रवक्ते प्रिंटु महादेव यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू अशी धमकी दिली. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केले. यानंतर काँग्रेसने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून तक्रार केली. काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी अखिल
भारतीय विद्यार्थी परिषदेचे केरळचे अध्यक्ष आणि सध्या भाजपचे प्रवक्ते
प्रिंटू महादेव यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केली आहे.
वेणुगोपाल यांनी पत्रात म्हटले आहे की, महादेव भाजपचे प्रवक्ते आहेत आणि
त्यांनी एका मल्याळम वृत्तवाहिनीवरील चर्चेवेळी ही धमकी दिली. सरकारने
त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर केंद्र सरकारही यात सहभागी आहे, असे
आम्ही समजू, असा गंभीर आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.
राहुल गांधींबद्दलचे विधान काय?
काँग्रेसने शाहांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "हिंसाचार भडकावण्याच्या घटनेतील एक महादेवने जाहीरपणे म्हटले आहे की, राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू. हा ना जीभ घसरण्याचा प्रकार आहे, ना चुकून केले गेले आहे. विचारपूर्वक लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे." "सत्ताधारी पक्षातील अधिकृत प्रवक्त्याकडून अशा प्रकारे विखारी शब्द वापरले जात आहे, त्यामुळे फक्त राहुल गांधींच्याच जीवाला धोका नाहीये, तर संविधान, कायद्याचे राज्य आणि नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुरक्षेचे उत्तरदायित्वही कमकुवत होतंय", असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे."जर तुम्ही या प्रकरणात ठाम आणि सार्वजनिकपणे कारवाई करण्यात अपयशी ठरलात, तर यात सरकारही सामील आहे, असे मानले जाईल. विरोधी पक्षनेत्याविरोधातील हिंसेला वैध करण्याचे आणि परवाना देण्याचे, तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेचे गंभीर उल्लंघन आहे", असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.